केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची घोषणा.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची घोषणा..

 केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची घोषणा..

धर्मांतर करणार्‍यांना आरक्षण नाही?

नवी दिल्ली :
केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मात धर्मांतरण करणार्‍या दलितांबाबत मोठी घोषणा केलीय. जे दलित ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारतील त्यांना कोणत्याही अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असं प्रसाद यांनी स्पष्ट केलंय.

     संविधानाच्या परिच्छेद 3 मध्ये अनुसुचित जातींबाबत म्हटलं आहे की हिंदु, शीख किंवा बुद्ध धर्माव्यतिरिक्त कोणत्याही धर्मातील व्यक्तीला अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.1950 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सरकारने अनुसुचित जातींची व्याख्या स्पष्ट करताना केवळ हिंदु धर्मात आस्था असणारी व्यक्ती अशी केली होती. नंतर 1956 मध्ये या व्याख्याचे व्याप्ती वाढवून हिंदु, शिख आणि बुद्ध यांचाही समावेश करुन व्याप्ती वाढवण्यात आली, असंही प्रसाद यांनी नमूद केलं.
प्रसाद म्हणाले, ज्या दलित नागरिकाने ख्रिश्चन किंवा मुस्लीम धर्म स्वीकारला आहे त्याला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अनुसुचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यांना एससी आरक्षित जागेवरुन निवडणूक लढता येणार नाही. याशिवाय त्यांना एससी आरक्षणाचा इतर कोणताही लाभ घेता येणार नाही.

No comments:

Post a Comment