स्थायी समिती सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 13, 2021

स्थायी समिती सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू!

 आ. संग्राम जगताप यांची भूमिका महत्त्वाची..

स्थायी समिती सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू!

नगरी दवंडी/
प्रतीनिधी
अहमदनगर ः स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सोमवारी सादर करण्यात येणार असून विभागीय आयुक्त तारीख व वेळ लवकरच जाहीर करणार आहेत. स्थायी समितीच्या सभापती पदासाठी इच्छुक उमेदवारांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून अविनाश घुले, भाजपाकडून सोनाबाई शिंदे, रवींद्र बारस्कर शिवसेनेकडून शाम नळकांडे, सचिन शिंदे, विजय पठारे, काँग्रेसकडून सुप्रिया जाधव स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक आहेत. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असली तरी शहरात मात्र भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसची युती असल्यामुळे आ. संग्राम जगताप यांची  ताकद  पाठीशी असणार्‍या उमेदवाराची सभापती पदावर वर्णी लागणार आहे.
    स्थायी समितीत नव्याने सदस्य म्हणून नियुक्ती झालेले सदस्यांनी यांनी सभापती पदासाठीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी सदस्याच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
     स्थायी समितीत राष्ट्रवादीचे अविनाश घुले व समद खान, सेनेकडून रिता भाकरे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपकडून रविंद्र बारस्कर व वंदना ताठे स्थायी समितीवर गेले आहेत. बसपाकडून मुदस्सर शेख यांनी स्वत:चेच नाव दिले आहे. स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले होते. नवीन आठ नगरसेवकांची सदस्य म्हणून नियुक्ती बुधवारी करण्यात आली. महापौर बाबसाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या सभेचा ठराव दुसर्या दिवशी गुरुवारी नगरसचिव कार्यालयास पाठिवण्यात आला. नगरसचिव एस.बी. तडवी यांनी सभापती पदासाठी वेळ व तारीख मिळावी, असा प्रस्ताव तयार करून त्यावर उपायुक्त डॉ प्रदीप पटारे यांची स्वाक्षरी घेतली आहे. आयुक्तांची मान्यता सोमवारी घेण्यात येणार असून, त्यानंतर प्रस्ताव नाशिक येथील विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment