न्यु आर्टस् महाविद्यालयास स्वायत्त दर्जा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

न्यु आर्टस् महाविद्यालयास स्वायत्त दर्जा

 न्यु आर्टस् महाविद्यालयास स्वायत्त दर्जा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने 2021-22 पासून पुढील दहा वर्षांकरिता स्वायत्त महाविद्यालय दर्जा दिला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांनी दिली. ते म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या स्थायी समितीच्या सभेत स्वायत्त दर्जा देण्याकरिता महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन, शैक्षणिक कामगिरी, पायाभूत सुविधा, शिक्षकांची शैक्षणिक गुणवत्ता व कामगिरी, विद्यार्थींची गुणवत्ता, अभ्यासक्रम पूरक व अभ्यासक्रमेत्तर क्षेत्रातील कामगिरी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, अभ्यासक्रम पूरक व अभ्यासक्रमेतर क्षेत्रातील कामगिरी तसेच महाविद्यालयाची स्वयात्तेसाठीची पूर्वतयारी इत्यादीचे मूल्यमापन करून महाविद्यालयास दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा घोषित करण्यात आला आहे. या
महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे एकत्रित 31 पदवी, 27 पदव्युत्तर, बारा पीएच.डी., तीन एम.फिल., सहा प्रमाणपत्र, तीन डिप्लोमा अभ्यासक्रम असे 81 अभ्यासक्रम शिकविले जातात. त्याचबरोबर विविध कौशल्य आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकविले जातात. महाविद्यालयात 235 प्राध्यापक ज्ञानदानाचे काम करतात. त्यात 69 पीएच.डी. पदवीप्राप्त, तर 90 प्राध्यापक नेट, सेट उत्तीर्ण आहेत. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त उपक्रमातील योगदानामुळे महाविद्यालयास आतापर्यंत इंदिरा गांधी एनएसएस पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट विभाग पुरस्कार, पुरुषोत्तम करंडक,
रंगवैखरी पुरस्कार मिळाले आहेत. महाविद्यालयात दृष्टी दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता मोफत शिक्षण देते. प्रतिबिंब राष्ट्रीय चित्रपट महोत्सव, नगारा संगीत महोत्सव नगर शहराची नवी ओळख झाली आहे. तर, महाविद्यालयाने निर्मित केलेल्या लघुपटांना राष्ट्रीयस्तरावर पुरस्कार मिळाले आहेत. तर विद्यार्थ्यांना बनविलेल्या चित्रपट,सांस्कृतिक क्षेत्रातील मानाचा पुरुषोत्तम करंडक इत्यादींमुळे महाविद्यालयाची समाजात वेगळी ओळख झाली. महाविद्यालयाच्या वाटचालीत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर व माजी पदाधिकारी, विश्वस्त, शिक्षक, विद्यार्थी यांचे बहुमोल योगदान राहिले आहे.

No comments:

Post a Comment