प्रभाग 2 मध्ये नगरसेवकांच्या समन्वयाने तीन कोटींची कामे- सुनिल त्र्यंबके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 24, 2021

प्रभाग 2 मध्ये नगरसेवकांच्या समन्वयाने तीन कोटींची कामे- सुनिल त्र्यंबके

 प्रभाग 2 मध्ये नगरसेवकांच्या समन्वयाने तीन कोटींची कामे- सुनिल त्र्यंबके

सूर्यनगर, एसटी कॉलनीत ड्रेनेज कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः वाढत्या वसाहतीबरोबरच नागरिकांचे प्रश्न वाढतात. प्रभाग दोन हा सर्वात मोठा असल्याने आमच्या या प्रभागात चारही नगरसेवकांच्या समन्वयाने तीन कोटींची कामे मंजूर झाली असून, अनेक कॉलनीतील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची फेज - 2 लाईन, ड्रेनेजची कामे झाली असून, येत्या महिन्याभरात प्रभागात विकासाची गंगा वाहताना दिसेल, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
तपोवन रोड, सूर्यनगरमधील एसटी कॉलनीतील बंद पाईप गटार  कामाचा शुभारंभ उद्योजक राजू बुधवंत यांच्या हस्ते झाला. नगरसेवक सुनिल त्र्यंबके पुढे म्हणाले, नागरिकांशी रोजचा असलेला संपर्क व आम्हा नगरसेवकांची एकी यामुळे प्रभागात सर्वच प्रश्न मार्गी लावले जात आहे. फेज-2 च्या कामामुळे लवकरच पाण्याचा प्रश्न सुटेल. रस्त्याच्या डांबरीकरणापूर्वी  ड्रेनेजची कामे सुरु आहेत. या कामासाठी नागरिकांनीही सहकार्य केले. स्वत:हून दारासमोरील ओटे काढल्याने कामात अडचण आली नाही. सर्वांच्या सहकार्यामुळे प्रश्न सुटतात, असे ते म्हणाले.
याप्रसंगी निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी या कॉलनीतील ड्रेनेजचा प्रश्न खूप वर्षांपासून प्रलंबित होता, सुनिल त्र्यंबके यांच्या विशेष प्रयत्नामुळे तो मार्गी लागला असून, लवकरच राहिलेल्या कॉलनीमधील ड्रेनेज, रस्ते कामे मार्गी लागतील, असे सांगितले. विनित पाउलबुधे, राजू बुधवंत यांनी प्रभागाच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी त्र्यंबके बोलत होते. यावेळी नगरसेवक विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, पांडूरंग दरंदले, डॉ.दिपक दरंदले, पवन काळे, सचिन गाडे, अफझल भाई, उस्मान सय्यद, नासीर सय्यद, अनिकेत गवळी, प्रविण कोहोक, संदिप वाघमारे, राजू शहाणे, राजेेंद्र गाडे, सविता काळे, शैला काळे, शारदा विधाते आदिंसह महिला, नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here