दुसरा टप्पा पोलीस व महसूल कर्मचार्‍यांसाठी! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

दुसरा टप्पा पोलीस व महसूल कर्मचार्‍यांसाठी!

 दुसरा टप्पा पोलीस व महसूल कर्मचार्‍यांसाठी!

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांची कोरोना लस घेण्याबाबत अनास्था..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः करोना व्हॅक्सिन आली असली तरी कोरोना चा धोका संपलेला नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं असताना आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या 3 टप्प्यां पैकी अद्याप 17 हजार 955 आरोग्य कर्मचार्‍यांनी लस घेतली नसल्याचे समजते. लसीकरणाचा आता दुसरा टप्पा सुरू होणार आहे या दुसर्‍या टप्प्यात पोलीस व महसूल कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार असून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले गुरुवार गुरुवार 18 फेब्रुवारीला यासाठी बैठक घेणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यासाठी  महिनाभरात प्राप्त झालेल्या 1 लाख 5 हजार लसीपैकी तब्बल 78 हजार 57 हजार लस  आजही आरोग्य यंत्रणेकडे पडून आहेत. महिनाभरासाठी आरोग्य विभागाने 47 हजार 645 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यांपैकी केवळ 26 हजार 57 जणांनाच लस देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी अद्यापि 23 हजार 77 कर्मचाऱयांनी लस घेतलेली नाही. यात 17 हजार 955 आरोग्य कर्मचारी व पाच हजार 122 पोलीस व महसूल कर्मचाऱयांचा समावेश आहे. देशासह राज्याला कोरोना पासून वाचवण्यासाठी नागरिकांना 16 जानेवारी पासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली . या लसीकरणात सर्वात आधी कोरोना काळात आपल्या जीवाला धोका असून सुद्धा काम करणारे फ्रंट लाईन कर्मचाऱयांना कोरोनाची लस देण्यात आली आहे . मात्र कोरोना लस येऊन महिना उलटत असतानाही अनेक आरोग्य कर्मचारी लस घेण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे.

No comments:

Post a Comment