विकास गुंजाळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

विकास गुंजाळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

 विकास गुंजाळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सध्या राहुरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पिंपळगाव माळवी येथील श्री विकास बाबासाहेब गुंजाळ हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात तिसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. नगरसेवक शाम (आप्पा) नळकांडे यांचे ते साडू आहेत.
श्री विकास गुंजाळ यांचे वडील व भाऊही सध्या पोलीस प्रशासनात कार्यरत आहेत. शेतकरी कुटुंबातील गुंजाळ यांनी मोठ्या जिद्दीने व चिकाटीने परिश्रम करून हे यश मिळवले आहे. बी.ए. शिक्षण घेतल्यानंतर 2011/12 च्या पोलीस भरती ते पोलीस म्हणून भरती झाले. आता त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल नगरसेवक शाम (आप्पा)  नळकांडे यांनी सत्कार केला. विकास गुंजाळ यांनी पोलिस प्रशासनात काम करताना सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांनी समाजाला न्याय द्यावा असे मत व्यक्त केले. श्री गुंजाळ याप्रसंगी म्हणाले की आई वडिलांची साथ व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचे मार्गदर्शन व साथ लाभल्यामुळे मी हे यश मिळवू शकलो. पोलीस प्रशासनाची मान उंचावेल असे कार्य करण्याचा माझा मानस आहे. मला सतत कौतुकाची थाप देणारे माझे मित्र, हितचिंतक यांचा आम्ही ऋणी आहे. असेही ते म्हणाले याप्रसंगी किसनराव नळकांडे, संजय (काका) शेळके, राजाराम शेंडगे (मेजर), योगेश चौधरी, सुशांत शिदे, भाऊ पोटे, गणेश चौधरी, राजेंद्र तापकिरे, आशिष गायकवाड, प्रवीण लोखंडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment