संयम चिकाटी ठेवून कष्ट केल्यास जीवनात यश निश्चितः नाईक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

संयम चिकाटी ठेवून कष्ट केल्यास जीवनात यश निश्चितः नाईक

 संयम चिकाटी ठेवून कष्ट केल्यास जीवनात यश निश्चितः नाईक

विखे पाटील अभियांत्रिकीत विद्यार्थ्यांचे स्वागत

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जीवनात अपयश हे यशाची पहिली पायरी असते. दहावीमध्ये नापास झालेले विद्यार्थी 12 वी मध्ये प्रथम क्रमांकाने येतात तर कधी बारावीत नापास झालेले इंजिनिअरींगच्या परिक्षेत टॉपवर येतात. विद्यार्थ्यांनी संयम, चिकाटी, आदर ठेवून कष्ट केल्यास जीवनात यश हे निश्चित मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी केले.
   विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयातील प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ.उदय नाईक बोलत होते. व्यासपीठावर डेप्युटी डायरेक्टर (टेक्निकल) प्रा.सुनिल कल्हापुरे, डॉ.सौ.एस.एम.मगर,  डॉ.दिपक विधाते,  डॉ.यु.ए.कवडे, डॉ.ए.के.पाटील आदि उपस्थित होते.
   डॉ.नाईक पुढे म्हणाले, 2020 वर्ष हे सर्वांना खूपच त्रासदायक गेले. 10 महिने शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. कोरोना महामारीनंतर आता विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रवेशानंतर देखील मास्क लावणे, सॅनिटायझर करुन सुरक्षित अंतर ठेवून कोरोनाशी लढा देत शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करावी, असे आवाहन केले.
सुनिल कल्हापुरे यांनी महाविद्यालयातील नियम, अटी, सूचनांचे काटेकोरपणे पालन विद्यार्थ्यांनी करावे. स्वत:च्या काळजीबरोबरच इतरांची काळजी घ्यावी. म्हणजे सर्वांचे स्वास्थ्य, आरोग्य उत्तम राहिल, असे सांगितले.
   यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच पालक उपस्थित होते. स्वागत समारंभासाठी संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पा., मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार डॉ.सुजय विखे पा. यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment