दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी रुकवालने केले नगर कॉलेजचे प्रतिनिधित्व - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी रुकवालने केले नगर कॉलेजचे प्रतिनिधित्व

 दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी रुकवालने केले नगर कॉलेजचे प्रतिनिधित्व


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2021 रोजी दिल्ली येथे राजपथावर पार पडलेल्या संचलनात एनसीसीच्या तुकडीमध्ये अहमदनगर कॉलेज अहमदनगर एनसीसी  कॅ डेट  ज्योती रुकवाल हिची निवड झाली होती. या माध्यमातून ज्योतीने कॉलेजचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले.
   जानेवारी 2021 मध्ये दिल्ली येथेल एनसीसीचे राष्ट्रीय पातळीवरील प्रजासत्ताक दिन शिबीर यशस्वीपणे  पूर्ण करून ज्योती कॉलेजमध्ये परतली त्या प्रसंगी प्राचार्य डॉ आर.जे.बार्नबस यांनी तिचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन केले.
   या प्रसंगी प्राचार्य म्हणले कि, कोरोना काळातील महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे आणि कॅ डेटचे यश उल्लेखनीय आहे. आत्मविश्वास, कठीण परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. महाविद्यालयास या यशाचा सार्थ अभिमान आहे. ज्योतीला आर्मी मध्ये अधिकारी व्हायचं आहे, त्यासाठी प्राचार्यांनी  शुभेच्छा दिल्या.
   एनसीसी सहयोगी अधिकारी लेफ्टनंट डॉ.एम.एस. जाधव यांनी कॅ डेट ज्योती हिच्या शिबिरासाठी झालेल्या निवडीपासून ते विविध पातळीवर निवड प्रक्रीया व विविध शिबिरा दरम्यान झालेल्या विविध स्पर्धां विषयी तसेच ज्योतीच्या सहभागा संबंधी माहिती दिली.
   ज्योतीने औरंगाबाद येथे विभाग पातळीवर बेस्ट कॅडेट स्पर्धेत,  पुणे येथील विविध निवड चाचण्या व स्पर्धा, त्यातून करोना पार्श्वभूमीवर 26 कॅडेटच्या महाराष्ट्र  एनसीसी गटात निवड, दिल्ली येथे राजपथ एनसीसी संचलन तुकडीत सहभाग, आणि प्रधानमंत्री रँली  इ. प्रकारात आपला सहभाग नोंदवला.   या वर्षी प्रजासत्ताक दिन शिबिरा दरम्यान झालेल्या विविध स्पर्धान मध्ये महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला.  अशा 26 कॅडेटच्या संघात अहमदनगर कॉलेजची कॅडेट सहभागी होती हा विशेष आनंद आहे.
   ज्योतीच्या येश्स्वी कामगिरी बद्दल महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नागवडे, डॉ.गायकर डॉ. रझाक, डॉ. गायकवाड, रजिस्टर बळीद, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, सर्व विद्यार्थी व एनसीसी कॅडेट्स तिचे अभिनंदन केले. कॅ डेट ज्योतीच्या या यशस्वी कामगिरीसाठी तिला, 17 महारष्ट्र बटालियनचे सिओ कर्नल जीवन झेंडे, एओ कर्नल विनय बाली, कॉलेज एनसीसी अधिकारी लेफ्टनंट एम एस जाधव व बटालियन मधील एसएम साहब, पीआय स्टाफ इ. मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment