प्रवासी म्हणून वाहनात बसून लुटणारी... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

प्रवासी म्हणून वाहनात बसून लुटणारी...

 प्रवासी म्हणून वाहनात बसून लुटणारी...

तरुणांची टोळी 24 तासाच्या आत गजाआड..
कोतवाली पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे पोलिस पथकाची कारवाई


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः बसस्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनात प्रवासी म्हणून बसणे... निर्मनुष्य रस्त्यावर वाहन थांबवून त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटणे.. त्यांचे एटीएम, क्रेडिट कार्ड घेवून पासवर्डची माहिती घेवून त्यातील रक्कम हडपणे. व त्यांचेच वाहन चोरून ते वाहन भंगारात विकणे असे प्रकार करणार्‍या अशा तरुणांच्या एका टोळीला कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे नेतृत्वाखालील पोलीस पथकाने अवघ्या 24 तासात गजाआड करून या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्याचा तपास करणे व आरोपींचा तपास करणे हे मोठे आवाहन असताना पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात फोरव्हीलर ची विल्हेवाट लावत असतानाच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सदर घटनेची हकीकत अशी, की दत्तात्रय खंडू हापसे वय 32 वर्ष रा.टाकळीमिया ता. राहुरी हे माळीवाडा परिसरात त्यांचे वाहनासह थांबले असताना दि 22 फेब्रुवारीला 8वा सुमारास माळीवाडा अहमदनगर येथून राहुरी येथे जाण्याकरिता पॅसेंजर म्हणून गाडीत बसलेल्या पाच अनोळखी पुरुषांनी रात्री नऊ वा.ते11:45 वा. च्या दरम्यान नांदगाव फाटा ता नगर येथे उलटी आल्याचे कारणावरून गाडी थांबवण्यात सांगून त्याचे डोळ्यात तिखट टाकून गळ्याला टोकदार वस्तू लावून त्यानं पाठीमागील सीटचे मध्ये धरून सुपा येथे घेऊन जावून त्याचे एटीएम व क्रेडिट कार्ड हिसकावून घेवून व त्याचा पासवर्ड बळजबरीने विचारुन मारुती रियाज कंपनीची फोर व्हीलर गाडी घेवून पळून गेले त्यांचे फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास व आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक श्री राकेश माणगावकर यांना या गुन्ह्यातील आरोपी हे पुणे चाकण परिसरात सदर गाडीचीविल्हेवाट लावण्याकरिता थांबलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने गुन्हेशोध पथकासह चाकण पुणे येथे जाऊन सापळा लावून तांत्रिक विश्लेषण करून संशयित इसमास ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपूस करता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्याचे नाव बाबासाहेब उर्फ बाबू बाळू शिंदे वय 20 वर्ष रा दहिवंडी ता शिरूर कासार जी. बीड येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने योगेश संजय आघाव वय 19 वर्ष रा दहवंडी ता शिरूर कासार जि बीड यास शिरूर कासार बीड मधून ताब्यात घेतले असून त्याचा एक साथीदार फरार झालेला आहे,त्याने गुन्ह्यातील बळजबरीने हिसकावून घेऊन गेलेली फोर व्हीलर कार व क्रेडिट कार्ड असा मुद्देमाल त्याचेकडून हस्तगत केलेला आहे, पुढील तपास सपोनि विवेक पवार हे करीत आहे.
   ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विशाल शरद ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर सो, व गुन्हे शोध पथकाचे सपोनि विवेक पवार, पोना गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना रवींद्र टकले, विष्णू भागवत, नितीन शिंदे, शाहिद शेख, सुमित गवळी, पोकॅा सुशील वाघेला, योगेश कवाष्टे, भारत इंगळे, कैलास शिरसाठ, तान्हाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, व मोबाइल सेलचे पोकॅानितीन शिंदे, प्रशांत राठोड यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment