आयुक्तांनी आज पदभार स्वीकारला.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 25, 2021

आयुक्तांनी आज पदभार स्वीकारला..

 आयुक्तांनी आज पदभार स्वीकारला..

आयुक्तांपुढे कोरोना व विकासकामांचे आव्हान.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त शंकर गोरे यांनी पदभार स्वीकारला. सध्या वाढत असलेल्या करोना प्रादुर्भावास रोखणे हे आयुक्तांपुढे मोठे आव्हान राहणार आहे. शहरातील कोवीड सेंटर पुन्हा सुरू करणे. मास्क, सॅनिटायझर वापर करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करणे. राज्य शासनाच्या निदर्शनाला नुसार करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध योजना राबविण्याबरोबर शहरातील पाणी प्रश्न, गटार योजना, रस्त्याची कामे या प्रश्नांचा लवकरात लवकर अभ्यास करून राबविण्यासाठी आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
   विकासात्मक धाडसी निर्णय घेणार्‍या आयुक्तांची नगर शहरात गरज आहे पण असा आयुक्त नगर शहरात कधीच मिळत नाही. नव्याने आलेल्या आयुक्तांना मनपा प्रशासनातील जुने अधिकारी कधीच स्वतंत्रपणे काम करून देत नाहीत हा इतिहास आहे. शहरातील प्रश्नांचा अभ्यास करून नवे आयुक्त शहरातील प्रश्नांची सोडवणूक करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
   आयुक्तांनी पदभार स्वीकारला या प्रसंगी उप आयुक्त यशवंत डांगे उप आयुक्त डॉ प्रदीप पठारे सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे दिनेश सिनारे सचिन राऊत उद्यान निरिक्षक शशिकांत नजन गवाजी झिने शेखर देशपांडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here