आ. लहू कानडे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित करणार... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 25, 2021

आ. लहू कानडे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित करणार...

 आ. लहू कानडे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित करणार...

“फायर सेफ्टी ऑडिट” बाबत आरोग्य प्रशासन उदासीन!

भंडारा जिल्ह्यात 8 जानेवारीला आगीत हेरपळून 10 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर 21 जानेवारी पर्यंत सर्व रुग्णालयाचे फायर सेफ्टी ऑडिट करण्याच्या शासनाचा आदेशाला केराची टोपली..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिट मध्ये (डछउण) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा 8 जानेवारीला मृत्यू झाल्याची  घटना  घडल्यानंतर  राज्यातील  सर्व  सरकारी  रुग्णालयां मध्ये ‘फायर सेफ्टी ऑडिट’ तसेच रुग्णालयातील वैद्यकीय विद्युत उपकरणाचे इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी जिल्हा शल्यचिकित्सकासह सर्व जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकार्यांना 21 जानेवारीपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले असताना जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयाच फायर सेफ्टी ऑडिट न झाल्याबद्दल आ. लहू कानडे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार आहेत.
राज्य शासनाच्या नगर विकासाकडून जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील व मनपा आयुक्तांना लेखी पत्र देण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की आ. लहू कानडे 2021 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार आहेत.अहमदनगर शहरातील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर कोणत्याही रुग्णालयाचे फायर ऑडिट झाल्याची नोंद महानगरपालिकेकडे नसल्याची बाब दिनांक 11.01.2021 रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, शहरातील सर्व खाजगी शासकीय इमारती, शाळा महाविद्यालय औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनाच्या इमारती, हॉस्पिटल, निवासी इमारती यांना महानगरपालिकेने फायर ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले होते. त्याची काय माहिती आपणाकडे आहे?
   आत्तापर्यंत किती खाजगी शासकीय इमारती शाळा, महाविद्यालय, औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनाच्या इमारती, हॉस्पिटल, निवासी इमारती यांनी महानगरपालिकेस फायर ऑडिट करून अहवाल सादर केले आहेत, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? जिल्हाधिकारी यांना 1 मार्च पर्यंत एकत्रित अहवाल सविस्तर टिपनासह ई-मेल वर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
   आ.लहू कानडे यांनी उपस्थित केलेल्या विषयांकित तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती तात्काळ शासनास सादर करावी असे आदेश मनपा आयुक्तांना ही देण्यात आले आहेत. अहमदनगर शहरातील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर कोणत्याही रुग्णालयाचे फायर ऑडिट झाल्याची नोंद महानगरपालिकेकडे नसल्याबाबत प्रश्नात विचारणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडे या सर्व रुग्णालयांची नोंद अपेक्षित आहे का हे स्पष्ट करावे. तसेच,जिल्ह्यातील इतर रुग्णालयांची फायर ऑडिटची नोंद कोणाकडे केली जाते हे स्पष्ट करावे. जिल्हा शासकीय रुग्णालयात सद्यस्थितीत स्थायी अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली आहे काय. तसेच सदर रुग्णालयाचे फायर ऑडिट ची नोंद महानगरपालिकेकडे कधी करण्यात आली आहे, शहरातील सर्व खाजगी शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालय, औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनाच्या इमारती, हॉस्पिटल, निवासी इमारती यांना महानगरपालिकेने फायर ऑडीट करण्याचे आवाहन केले असले तरी, याबाबत महानगरपालिकेने आदेश कधी काढले आहेत, प्रश्न भाग-3 च्या अनुषंगाने किती इमारतींचे फायर ऑडिट प्रलंबित आहे व याबाबत महानगरपालिकेकडून काय कार्यवाही करण्यात येत आहे. याचीही माहिती नगरविकास विभागाकडून आयुक्तांकडे मागविण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here