प्रदुषण नियंत्रणासाठी सीएनजी अ‍ॅटो रिक्षा एक चांगला पर्याय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

प्रदुषण नियंत्रणासाठी सीएनजी अ‍ॅटो रिक्षा एक चांगला पर्याय

 प्रदुषण नियंत्रणासाठी सीएनजी अ‍ॅटो रिक्षा एक चांगला पर्याय

बजाजच्या सीएनजी अ‍ॅटो रिक्षाचे वितरण

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीकोनाने नव्याने आलेल्या बजाजच्या सीएनजी अ‍ॅटो रिक्षाचे वितरण नगर-औरंगाबाद महामार्ग, शेंडी-पोखर्डी येथील बजाजच्या जीत मोटर्स शोरुममध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी शोरुमचे संचालक अभिमन्यू नय्यर, इंद्रजीत नय्यर, अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायतचे अध्यक्ष वैभव जगताप, राष्ट्रवादीचे युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, जनक आहुजा, राजीव बिंद्रा, अनिश आहुजा, जतीन आहुजा, अनुज बिंद्रा, रितेश नय्यर, सागर पवार, आफ्रिदी सय्यद, गुलाम दस्तगीर, सागर काळभोर, विजय शेलार, फैरोज तांबोली आदी उपस्थित होते.
    संग्राम जगताप म्हणाले की, प्रदुषण नियंत्रणासाठी सीएनजी अ‍ॅटो रिक्षा एक चांगला पर्याय पुढे आला आहे. नगर शहरात सीएनजी पंम्प देखील सुरु होत आहे. पेट्रोलचे भाव गगनाला भिडत असताना डिझेल देखील महाग होत आहे. महागाईत पर्याय म्हणून सीएनजी कमी दरात उपलब्ध होणार असून, मायलेज अधिक असल्याने रिक्षा चालकांची एकप्रकारे बचत देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शोरुमचे संचालक अभिमन्यू नय्यर म्हणाले की, पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहता सीएनजी अ‍ॅटो रिक्षांना चांगली मागणी आहे. अधिक मायलेज व कमी प्रदुषण होत असल्याने ही रिक्षा चांगला पर्याय म्हणून समोर आली आहे.
सीएनजी मध्ये बजाज आरई व बजाज मॅक्सिमा झेड हे दोन मॉडेल उपलब्ध असून, दोन्ही मॉडेलचे अंदाजे 43 ते 45 प्रति कि.मी. मायलेज आहे. या अ‍ॅटो रिक्षांना एक आकर्षक लूक उपलब्ध करुन अद्यावत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तीन वर्षाची वॉरंटी कंपनीने दिली आहे. रिक्षा पाहण्यासाठी शोरुममध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment