रस्ता व ड्रेनेज लाईन कामाचा कर्डिलेंच्या हस्ते शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

रस्ता व ड्रेनेज लाईन कामाचा कर्डिलेंच्या हस्ते शुभारंभ

 रस्ता व ड्रेनेज लाईन कामाचा कर्डिलेंच्या हस्ते शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महानगरपालिकेत भाजपाची सत्ता येउन आज दोन वर्षे झाले असून या काळात महापौर व नगरसेवकांनी मोठया प्रमाणात नगर शहरांच्या विकासाचे कामे केली यात रस्ता,पिण्याचे पाणी,ड्रेनेज लाईन आदी प्रश्न बर्‍यापैकी मार्गी लावण्याचे काम केले आहे. भाजपाचे सरकार असल्याने हे होत आहे. या प्रभागातही साधारणत 60 लाखाचे काम असून ते लवकरच पुर्ण होईल. असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी केले.
   नगरसेविका वंदना विलासराव ताठे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि  महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 6 भुतकरवाडी चौक ते भिंगारदिवे मळा रस्ता व ड्रेनेज लाईनचे  माजी  आमदार शिवाजी कर्डीले यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
   उदयाचा महापौरपण भाजपाचा होईल असा विश्वासही शिवाजी कर्डीले यावेळी व्यक्त केला. नगरसेविका  वंदना विलासराव ताठे म्हणाल्या की, चांगला रस्ता, मुबलक वीज व पाणी हे प्रभागात पाहीजे ते आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत.सातत्याने नागरिकांच्या गरजा कश्या भागवता येईल याकडे लक्ष दिले जात आहे.प्रभागाचा विकास हा महत्वाचा आहे.
   यावेळी महापौर बाबासाहेब  वाकळे, सभागृहनेता मनोज दुल्लम, भाजप शहराध्यक्ष भैय्या गंधे, नगरसेवक रविंद्र बारस्कर,नगरसेविका वंदना ताठे, पल्लवी जाधव,विलास ताठे, उदय कराळे,संजय ढोणे,मनोज ताठे, संकेत ताठे यावेळी दगडुमामा पवार,ईश्वर पडोळे,बाबासाहेब जगताप, अरुण जगताप, रावसाहेब कोरेकर,अनुराग पडोळे,आप्पासाहेब पडोळे,संजय भुतकर, साठे,आशिष भगत, ब्रिर्जेश ताठे, नारायण नेमाने,अरुण शिंदे, संजय सत्रे, प्रशांत शिंदे, अ‍ॅड. सुनील सूर्यवंशी, महिला बचत गटाच्या अध्यक्षा कमल दळवी,भीमाबाई जगताप,दिपाली शिंदे,सोनाली अजबे,सुवर्णा दळवी,चंदाबाई जगताप,कुसुम चौधरी, जाधवसर, संकेत ताठे,ऋत्विक ताठे,संजय सत्रे, सनी दळवी, दत्तात्रय भगत यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here