बाबासाहेबांचा वारसा संस्था जपत असल्याचा अभिमान ः आंबेडकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

बाबासाहेबांचा वारसा संस्था जपत असल्याचा अभिमान ः आंबेडकर

 बाबासाहेबांचा वारसा संस्था जपत असल्याचा अभिमान ः आंबेडकर

पंचशील विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः 1936 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेस भेट दिली होती व संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली होती. तशी नोंद शाळेच्या व्हीजिट बुकमध्ये आजही पहावयास मिळते. हा शेरा समाज बांधव, नागरिक, अभ्यासक, विद्यार्थी यांना पहाता यावा यासाठी दरवर्षी यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.
   यंदांच्या वर्षी कार्यक्रम  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. याप्रसंगी बहुजन शिक्षण संघाचे कार्यकारी विश्वस्त संघराज रुपवते, संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड, सचिव वसंतराव म्हस्के, खजिनदार प्रा.जयंत गायकवाड, प्रा.रत्ना वाघमारे, प्रा.भिमराव पगारे,  रविंद्र कांबळे, सारंग पाटेकर, मुख्याध्यापक रमेश उकर्डे आदि उपस्थित होते.
   याप्रसंगी भिमराव आंबेडकर म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबडकरांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी मोठा लढा उभारुन त्यांना न्याय मिळवून दिला. यासाठी देशातील विविध भागात जाऊन त्यांनी समाजामध्ये जागृती करण्याचे काम केले. अहमदनगरशी त्यांचे विशेष नाते होते. त्यामुळे अनेकवेळी नगरला ते येऊ गेले आहेत. या दरम्यान पंचशील विद्या मंदिर शाळेच्या भेटीप्रसंगी दिलेला अभिप्राय आजही संस्थेने जपून ठेवला आणि तो आज मला पहावयाय मिळाला याचा मला अभिमान वाटतो. संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करत असल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या पदाधिकारी व शिक्षकांचे कौतुक केले.
   याप्रसंगी प्रा.भिमराव पगारे यांचा सेवानिवृत्तीबद्दल व रविंद्र पटेकर यांचा प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलप्रसाद तिवारी यांनी केले तर आभार शेखर उंडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment