क्रांतिगुरु लहुजी वस्ताद यांना अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

क्रांतिगुरु लहुजी वस्ताद यांना अभिवादन

 क्रांतिगुरु लहुजी वस्ताद यांना अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः अखंड ब्रम्हचर्य पत्करून स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान देणारे क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकल मातंग समाजाच्या वतीने त्यांच्या सिद्धार्थनगर येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
   यावेळी सुनिल सकट, राजु रोकडे, सुनिल भोसले, ज्ञानेश्वर रोकडे, गणेश ढोबळे, सतिश नवगिरे,सतिश बोरुडे, महादेव नेटके,अनिल ससाणे आदीसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
   प्रसंगी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करून समाजाच्या वतीने विचार मांडताना सुनिल सकट म्हणाले अनेक वेळा आंदोलन करूनही समाजाची दखल घेतली जात नाही.शासनाने  लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्यावे, सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचे संरक्षण व्हावे यासाठी पुतळ्याभोवती सी सी टीव्ही कॅमरे बसविण्यात यावे,शासनाच्या वतीने लहुजी साळवे यांच्या नावाने पुरस्कार देण्यात यावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे अशा विविध प्रश्न विषया संदर्भात मागणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment