नो मास्क, नो इन्ट्री! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

नो मास्क, नो इन्ट्री!

 नो मास्क, नो इन्ट्री!

धोरणाची अंमलबजावणी सुरू..

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यात आता जनतेने प्रशासनांच्या बरोबरीने काम करत ‘नो मास्क नो इन्ट्री’ या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं आवाहन अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
   महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्यात देखील दक्षता घेण्यात येत आहे. अशात अहमदनगर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, विविध कार्यालय, संस्था, दुकाने या सर्वांनी आपल्याकड़े येणार्‍या नागरिकांनी मास्क लावलेले आहे की नाही याची शहानिशा करून मास्क लावले असल्यास संबधितास दुकानात, कार्यालयात, महाविद्यालयात प्रवेश द्यावा अन्यथा प्रवेश देऊ नये त्यानुसार ’नो मास्क नो इन्ट्री’ अशा धोरणाची अंमलबजावणी केली पाहिजे जेणे करून कोरोनाच्या चढत्या आलेखाला रोखण्यात आपण यश प्राप्त करू असं आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जनतेला केल आहे.
   राज्याची स्थिती पाहता अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असला तरी प्रशासनांकडून पाहिजे त्या खबरदारी घेण्यात येत आहे. अशात आज स्वःत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी काल शहरातील महाविद्यालय तसेच मंगल कार्यालयांना अचानकपणे भेटी देऊन पाहणी केली.
   गेल्या दोन दिवसात अहमदनगर जिल्ह्यातील 2 हजार 300 जणांवर कारवाई करण्यांत आली असुन साधरण 2 लाख 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र परिस्थिती पाहता दंड महत्त्वाचा नसून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करून कोरोनां मात देण्यासाठी मास्कचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधीक्षकांनीं केले आहे.

No comments:

Post a Comment