नगर तालुक्यात 3 सेवा संस्थाच्या निवडणूकीचे पडघम.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

नगर तालुक्यात 3 सेवा संस्थाच्या निवडणूकीचे पडघम....

 नगर तालुक्यात 3 सेवा संस्थाच्या निवडणूकीचे पडघम....

जिल्ह्यातील 49 सोसायट्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जिल्ह्यातील 49 सहकारी सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला असून या मध्ये नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट, मदडगाव, बाळेवाडी या तीन संस्थांचा समावेश आहे.
   या तीन ही संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवार (दि.22) पासूनच प्रारंभ झाला आहे.  निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करण्याची मुदत 22 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी सकाळी 11ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. दाखल उमेदवारी अर्जांची छानणी 1 मार्च रोजी दुपारी 12वाजेपासून निवडणूक कार्यालयात सुरू होणार आहे. वैध असलेल्या उमेदवारी अर्जांची यादी 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 2 मार्च ते 16 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत असणार आहे. 17 मार्च रोजी निवडणूक लढविणार्या उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. त्यानंतर बाळेवाडी व मदडगाव या सेवा संस्थांसाठी दि.27 मार्च रोजी तर  बाबुर्डी घुमट सेवा संस्थेसाठी 29 मार्च रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान घेण्यात येणार असून मतदानानंतर लगेचच मतमोजणी करुन निकाल घोषित केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment