बोठेचा स्टँडिंग वॉरंट पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

बोठेचा स्टँडिंग वॉरंट पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला

 बोठेचा स्टँडिंग वॉरंट पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः बाळ बोठे याने पारनेर न्यायालयाने काढलेल्या स्टँडिंग वॉरंट विरुद्ध पुनर्निरीक्षण अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल केला होता. हा अर्ज आज प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश अणेकर यांनी फेटाळला व पारनेर न्यायालयाने दिलेला स्टँडिंग वॉरंटचा हुकूम कायम केला.
   रेखा जरे हत्या गुन्ह्यातील आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब बोठे हा दि. 30 डिसेंबर 2020 रोजी गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. त्याचा शोध पोलिसांनी घेतला असला तो मिळून आलेला नाही. त्यामुळे उप विभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण यांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पारनेर यांच्या न्यायालयात अहवाल सादर केला त्यावरून न्यायालयाने वॉरंटचा हुकूम केला या हुकुमा विरोधात आरोपी बाळ बोठे याने जिल्हा न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केलेला होता त्या मध्ये  वॉरंटचा हुकूम रद्द करण्या बाबत विनंती केली होती. प्रधान जिल्हा व स्तर न्यायाधीश यांनी आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तिवाद ऐकून घेऊन आरोपीने दाखल केलेला पुनर्निरीक्षक अर्ज फेटाळून लावला व पारनेर न्यायालयाने दिलेला स्टँडिंग वॉरंटचा हुकूम कायम केला आहे.  

No comments:

Post a Comment