छत्रपतींचा इतिहास समाजासाठी प्रेरणादायी : आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

छत्रपतींचा इतिहास समाजासाठी प्रेरणादायी : आ. संग्राम जगताप

 छत्रपतींचा इतिहास समाजासाठी प्रेरणादायी : आ. संग्राम जगताप

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध मंडळांनी कोरोनाचे नियम पाळून उत्साहात साजरी केली.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र करुन रयतेचे राज्य निर्माण केले. आजच्या युवापिढीला महाराजांच्या चरित्राची ओळख निर्माण व्हावी यासाठी विविध सामाजिक संस्थांनी व युवक मंडळांनी पुढे येऊन त्यांचा इतिहास त्यांच्यापुढे मांडावा. छत्रपतींनी समाजासाठी आयुष्यभर संघर्ष केला. रयतेला सुखी ठेवण्याचे काम केले. गेल्या 1 वर्षापासून कोरोना संसर्ग विषाणूमुळे समाजामध्ये एक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर मात करण्यासाठी समाजाने शासन नियमांचे वेळोवेळी नियमित पालन करणे गरजेचे आहे. संपूर्ण शहरामध्ये छत्रपतींची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन उत्साहात साजरी केली. मुस्लिम समाजाने शहरामध्ये विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.  
    शिवजयंतीनिमित्त बस स्थानक येथे इम्पिरियल चौक येथे अफजल भाई मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहराचे आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पै. गणेश साळवे, अजहर शेख, शोएब बिल्डर, मोहसीन शेख, फरहान शेख, विशाल खताळ, कुणाल हरबा, निखिल शिंदे, सागर शिंदे, विकी पाटोळे, मयुर भापकर, शुभम भापकर, श्रीकांत आंबेकर, अक्षय सांगळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment