कृषी पंपाची विज बंद केल्यामुळे वारणवाडी उपकेंन्द्रावर शेतकऱ्यांचे ठीय्या आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

कृषी पंपाची विज बंद केल्यामुळे वारणवाडी उपकेंन्द्रावर शेतकऱ्यांचे ठीय्या आंदोलन

 कृषी पंपाची विज बंद केल्यामुळे वारणवाडी उपकेंन्द्रावर शेतकऱ्यांचे ठीय्या आंदोलन 



नगरी दवंडी

पारनेर - गेली तीन दिवसांपासुन देसवडे, पोखरी परीसरातील कृषी पंपाची विज कोणतीही पुर्व सुचना न देता विज खंडीत  करण्यात आली आहे. तीन दिवसांपासुन विज नसल्यामुळे हाता तोंडाशी आलेले पिक पुर्णता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, खंडीत केलेली विज तात्काळ सुरू करण्यात यावी म्हणुन सकाळी ९ वाजल्यापासुन शेतकरी ठान मांडुन बसले आहेत. विज खंडीत न करण्याचा शासनाचा आदेश असतानाही अधिकारी मात्र शेतकर्यांना वेठीस धरत आहे 

 या वेळीभूमिपुत्र शेतकरी संघटनेचे  अध्यक्ष ,संतोष वाडेकर, देसवडे गावचे सरपंच पोपटराव दरेकर, पोखरी सरपंच सतीश भाऊ पवार, देसवडे कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय दादा भोर, ग्रामपंचायत सदस्य देसवडे सुयोग पप्पूदादा दाते, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब टेकुडे, ठमाशेठ भोर, युवा नेते संपत तोरकड, राजेंद्र गुंड ,नंदन भाऊ भोर, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास भाऊ शिवले, रामदास शिंदे निलेश पवार, कारभारी हाडवळे, नामदेव शिवले ,बबन पवार ,बाळा लक्ष्मण वाकळे ,तुकाराम हाडवळे, योगेश दाते ,प्रकाश टेकुडे ,अजय दाते, बाळासाहेब गुंड, बाबाजी शिंदे, दत्तात्रेय तोरकड, शिवाजी तोरकड ,संतोष दाते दिनकर टेकुडे ,पांडुरंग गुंड, बाळासाहेब गोरख गुंड ,सुरेश तोरकड ,प्रदीप टेकुङे ,गणेश टेकवडे, गावचे उपसरपंच सचिन भोर ,अदिनाथ पुरी, राजु डेरे, सचिन शंकर भोर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्खेने ऊपस्थित होते

No comments:

Post a Comment