कर्जत नगर पंचायतीच्या प्रारूप मतदार यादीवर 895 हरकती
नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जत नगर पंचायतीच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याच्या आज अखेरच्या दिवशीपर्यत 895 लेखी हरकती प्राप्त झाल्या आहेत. यादीवर हरकती नोंदवण्याची दि 22 फेब्रु रोजी सायं 5 वाजे पर्यतची अंतिम मुदत होती.
कर्जत नगर पंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी बनविण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दि 15 फेब्रु रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली, सदर यादी बनविण्यासाठी नगर पंचायतीच्या सर्व कर्मचार्याची नियुक्ती करण्यात आली होती, दोन टीम करून आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली, ज्या मतदारांचा सर्वसामान्य रहिवास ज्या प्रभागात आहे तो मतदार त्याच प्रभागात ठेवणे, एखाद्या प्रभागाच्या हद्दीतील किंवा नगर पंचायतीच्या हद्दीतील कोणताही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, तसेच नगर पंचायतीच्या हद्दीबाहेरील व्यक्तीचा प्रारूप मतदार यादीत समाविस्ट होणार नाहीत याची दक्षता घेऊन प्रारूप मतदार याद्या बनविण्यात आल्या. वेळोवेळी निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश व जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये मतदार यादयाचे काम केले. सदर याद्या बनविताना 1403 नावे निवडणूक आयोगाने दिलेल्या 999 च्या सुविधे अंतर्गत स्वतंत्र काढण्यात आली त्याचे शहरात वास्तव आढळत नाही, अशा लोकांचा यामध्ये समावेश आहे. आज हरकती घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऐकून 895 हरकती दाखल झाल्या असल्याची माहिती कर्जत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.
नगरपंचायत प्रारूप मतदार यादी वर दिनांक 15 -2 -2021 ते दिनांक 22- 2 -2021 या कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनावर नियमाप्रमाणे विचार करून प्रभाग निहाय मतदार यादी अंतिम करणे कामी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जबाबदारी पार पाडणे साठी जिल्हाधिकारी यांनी कर्जतचे उपविभागीय अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे. यानुसार आलेल्या हरकतीवर प्रांताधिकारी अर्चना नष्टे या निर्णय घेणार असून अंतिम मतदार यादी 1 मार्च रोजी जाहीर करणार आहेत.
पाच वर्षांपूर्वी कर्जत नगर पंचायतीच्या प्रारूप मतदार यादीवर सुमारे साडे चार ते हजार हरकती आल्या होत्या व त्यावरून मोठा गोंधळ झाला होता, अनेकांनी त्यावेळी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यामुळे यावेळी कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी अत्यंत तटस्थपणे काम करत याद्या बनविल्या असल्यातरी यावर आलेल्या हरकतीतुन पुढे काय होते याकडे सर्वाचेच लक्ष राहणार आहे.
No comments:
Post a Comment