अबब! स्कूल बस चोरीला! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

अबब! स्कूल बस चोरीला!

 अबब! स्कूल बस चोरीला!

ठाण्याची बस सापडली नेवाशाला.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः टू व्हीलर, फोर व्हीलर चोरीला गेल्याच्या घटना आपण नेहमीच पाहत आलेलो आहे. पण मोठी वाहन क्षमता चोरीला गेली असल्याची घटना क्वचितच पाहिली असेल. बुधवारी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून बस चोरून ती नगर जिल्हाकडे गेली असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस निरीक्षक कोचरे यांनी नगर पोलिसांना कळविले होते. ती बस नेवासा रस्त्यावरील त्रिमूर्ती कॉलेजच्या मागे सापडली आहे.
   अंबरनाथ पोलिसांच्या माहितीच्या आधारे नगर जिल्ह्यातील सर्व प्रमुखांना याबाबत सतर्क करण्यात आले होते.त्यानुसार शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे हे देखील या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी शेवगावचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांना ही जबाबदारी दिली होती. त्यानुसार सदरची स्कूल बस नेवासा रस्त्यावरील त्रिमुर्ती कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या पटांगणात उभी असल्याची माहिती पो.नि.गोरे यांना गुप्त खबर्‍याने दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी या ठिकाणी छापा टाकला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच चोरटे बस सोडून पसार झाले. शेवगाव पोलिसांनी ही ताब्यात घेतली आहे. या कारवाईत पो.कॉ.वसंत फुलमाळी, कैलास पवार, नारायण बडे, संदीप बर्डे यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment