गॅस सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

गॅस सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले!

 गॅस सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले!

गॅस टाकी आता 794 रुपयांना.
तीन महिन्यात सातत्याने दरवाढ..
  1 डिसेंबर - 644 रु.
1 जानेवारी - 694 रु.
4 फेब्रुवारी - 719 रु.
15 फेब्रुवारी - 769 रु.
25 फेब्रुवारी - 794 रु.


नवी दिल्ली -
इंधन दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता  25  रुपयांनी वाढ करण्यात आली. यामुळे  घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने  सामान्यांचे एकंदरित महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आज पासून (25 फेब्रुवारी) हे दर लागू होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसर्‍यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. सिलेंडरची किंमत 694 रूपयांवरून 719 रुपये करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment