लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम त्वरित पूर्ण करावे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 25, 2021

लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम त्वरित पूर्ण करावे

 लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम त्वरित पूर्ण करावे

नगरी दवंडी/प्रतिनिधी
मिरी ः सन 2017-18 पासून अपूर्ण असलेल्या घरकुलाच्या लाभधारकांनी लवकरात लवकर आपल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करावे अशा सूचना पाथर्डी तालुका गटविकास अधिकार्यांकडून देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाच्या महाआवास अभियानाच्या माध्यमातून अपूर्ण असलेल्या घरकुलाच्या लाभधारकांना सूचना देऊन घरकुलाचे सुरू न केलेले व अपूर्ण असलेले बांधकाम त्वरित पूर्ण करावे अन्यथा लाभार्थी शासनाच्या मिळणार्‍या लाभापासून वंचित राहू शकतात अशा सूचना पाथर्डी तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी दिल्या आहेत.तालुक्यातील मिरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संबंधित अधिकारी व निवडक लाभधारकांच्या बैठकीदरम्यान खिंडे यांनी सदर सूचना केल्या आहेत.
   महाआवास अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील अपूर्ण घरकुल हे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन लाभधारकांशी चर्चा करत असल्याची माहिती गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी दिली आहे.
   मिरी येथे झालेल्या बैठकीदरम्यान गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्यासह तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.जगदीश पालवे, सहाय्यक गटविकास अधिकारी शेळके साहेब,उपअभियंता राठोड साहेब, विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी राजेंद्र साखरे व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment