इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट नगर कार्यकारिणी जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट नगर कार्यकारिणी जाहीर

 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट नगर कार्यकारिणी जाहीर

आर्किटेक्ट अर्शद शेख पुन्हा अध्यक्षपदीनगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः आर्किटेक्चर क्षेत्रात भारतातील सर्वात अग्रगण्य संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट (खखअ) देशव्यापी निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्यात अहमदनगरच्या कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आर्किटेक्ट अर्शद शेख यांची अहमदनगर शाखेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा एकमताने निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी आर्किटेक्ट प्रल्हाद जोशी आणि सचिवपदी आर्किटेक्ट संतोष गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. आर्किटेक्ट अरूण गावडे, मयुरेश देशमुख, तेजस दारोकर, अमित चिमनानी, सुवर्णा निमसे (नळकांडे), प्रवीण अरु, सुरज झिने आणि आदित्य अडप संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य असतील.
    इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट ही आर्किटेक्ट व्यावसायिकांची शिखर संस्था आहे. जवळपास 25 हजार आर्किटेक्ट सभासद असलेली ही संघटना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करते. आर्किटेक्चर क्षेत्राची पातळी परस्पर सहकार्याने उंचावणे, आर्किटेक्चरच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रचार आणि प्रसार, शहर विकास आराखड्यासंदर्भात सूचना करणे इत्यादी महत्त्वाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. नवीन कार्यकारिणीचे सर्वांकडून स्वागत आणि अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment