ज्ञानेश्वर कारखान्याचं चेअरमन नरेंद्र घुले तर व्हा.चेअरमन पांडुरंग अभंग - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

ज्ञानेश्वर कारखान्याचं चेअरमन नरेंद्र घुले तर व्हा.चेअरमन पांडुरंग अभंग

 ज्ञानेश्वर कारखान्याचं चेअरमन नरेंद्र घुले तर व्हा.चेअरमन पांडुरंग अभंग


नेवासा ः
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील तर उपाध्यक्ष पदी माजी आमदार पांडुरंग गमाजी अभंग यांची बिनविरोध निवड झाली आहे.

   नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागांची निवडणूक माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नेतृत्वाखालील दि.21 जानेवारी रोजी बिनविरोध झाली होती. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांचे अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची सभा मंगळवार दि.2 फेब्रुवारी रोजी 11 वाजता कारखाना अतिथीगृहात संपन्न झाली.अध्यक्ष पदासाठी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील व माजी आमदार पांडुरंग गमाजी अभंग यांचे एक एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी यांनी केली.
   यावेळी मावळते अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,जेष्ठ संचालक अड देसाई देशमुख, डॉ.क्षितिज घुले पाटील,काकासाहेब नरवडे,विठ्ठलराव लंघे,कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांचे सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment