दिल्लीगेट ते नीलक्रांती चौक रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 2, 2021

दिल्लीगेट ते नीलक्रांती चौक रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ

 दिल्लीगेट ते नीलक्रांती चौक रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ

मंजूर कामे तत्काळ सुरू करावीत : आ. जगताप

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे जनतेच्या मनात महापालिका प्रशासनबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. रस्त्यांवरून वाहने चालविताना विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यात छोटे-मोठे अपघात, धूळ यामुळे सर्व नगरकर त्रस्त झाले आहेत. या परिस्थितीमुळे जनतेच्या मनात अशाप्रकारचा रोष निर्माण होणे स्वाभाविक आहे. फेज2 पाणी योजना व भुयारी गटारी योजनेची कामे मध्य शहरी भागात बर्‍यापैकी पूर्ण झालेली असून, या भागात उखडलेले रस्ते तत्काळ दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात यावे तसेच मंजूर रस्त्यांची कामे तत्काळ सुरु करावे. दिल्लीगेट ते नीलक्रांती चोकापर्यंतच्या रस्ता डांबरीकरण कामाला सुरुवात झाली आहे, अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.
   दिल्लीगेट ते नीलक्रांती चौकापर्यंतच्या रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, मा.नगरसेवक अँड. धनंजय जाधव, माजी उपमहापौर दीपक सूळ, प्रा. अरविंद शिंदे, नगरसेवक कुमार वाकळे, सारंग पंधाडे, संजय झिंजे, शहर अभियंता सुरेश इथापे, बापू राजे भोसले, राहुल मुथा, सनी शिंदे, दिलदारसिंग बीर, सनी आगरकर आदी उपस्थित होते.
   यावेळी महापौर वाकळे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या स्वरुपात निधी प्राप्त झाला असून, शहरातील विविध विकासकामे महापालिकेच्या माध्यमातून मंजूर आहेत. ती कामे आता सुरु झाली आहेत. अनेक विकासकामांच्या निविदा पूर्ण झाले असून लवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. कोरोना टाळेबंदीमुळे विकासकामांना मर्यादा आल्या होत्या. आता हळूहळू सर्व कामे सुरू होत असल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment