प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सोयीने करण्यासाठी प्रयत्न करू ः वरुटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सोयीने करण्यासाठी प्रयत्न करू ः वरुटे

 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सोयीने करण्यासाठी प्रयत्न करू ः वरुटे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या जिल्हा मेळाव्यात शेतकरी भवन,मार्केट यार्ड अहमदनगर येथे आयोजित मेळाव्यात बोलताना राज्यातील सर्व शिक्षकांच्या बदल्या सोयीने करू तसेच एमएस सीआयटी वसुली थांबवू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरूटे यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर संघाचे संपर्कप्रमुख विष्णू खांदवे,माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे,रवींद्र पिंपळे,संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे,मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत व बहुसंख्येने संघ व सदिच्छा प्रेमी उपस्थित होते.
   शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाची ताकद आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आली.सदिच्छा मंडळ स्वबळावर आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचा निर्धार मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत यांनी बोलून दाखवला. राज्यातील शिक्षकांच्या समस्या सोडवणारी प्राथमिक शिक्षक संघ ही एकमेव संघटना असून शिक्षकांच्या दरमहा एक तारखेला पगार करणे,केंद्रप्रमुख सुधारीत पदोन्नती निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांमधूनच भरती करावी,कोल्हापूरच्या धर्तीवर सर्व शिक्षकांना निवड श्रेणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार अशा विविध मागण्या यावेळी राज्याध्यक्ष राजाराम वरूटे यांनी सोडविण्यासाठी मंत्र्यांच्या मदतीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
    जुनी पेन्शन ,आश्वासीत प्रगती योजना लागू करणे,एमएस सीआयटी वसुली थांबवणे आदि प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचं यावेळी वरूटे यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात राज्य संघाचे संपर्कप्रमुख विष्णुपंत खांदवे यांनी सदिच्छा एक वटवृक्ष आहे,आगामी काळात पुन्हा सत्तेवर सभासद आणतील अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी पारनेर तालुका संघ व सदिच्छा मंडळ कार्यकारिणी जाहीर केली व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले.प्रसंगी नेवासा तालुक्यातील गुरुकुलचे संतोष पुरोहित व कानिफनाथ दौंड यांनी सदिच्छा मंडळात प्रवेश केला.नगरपालिका संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कबाडी यांना राज्य आदर्श पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.मेळाव्यासाठी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष रहिमान शेख,महिला आघाडीच्या अध्यक्षा मीना गिरमे - जाधव,सदिच्छा मंडळाचे कार्याध्यक्ष बाबाजी आव्हाड,संघाचे कोषाध्यक्ष शैलेश खणकर, माजी चेअरमन नवनाथ तोडमल,महिला आघाडीच्या नेत्या संगीता कदम, माजी चेअरमन प्रतिभा साठे,सतीश चाबुकस्वार,कार्याध्यक्ष दादा वाघ यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.मेळाव्याला उच्चाधिकार अध्यक्ष गजानन ढवळे,माजी विश्वस्त बाळासाहेब खिलारी,अनिल आंधळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कैलास वर्पे,सरचिटणीस बबनराव गाडेकर,माजी चेअरमन गाहिनीनाथ शिरसाठ,श्रीकृष्ण कंठाळी,उत्तर जिल्हा प्रमुख चंद्रकांत मोरे,पारनेर सदिच्छा मंडळ अध्यक्ष संतोष खामकर,उद्धव मरकड,केशवराज कोल्हे, संघाचे सरचिटणीस बाळासाहेब डमाळ,महिला आघडीच्या कोषाध्यक्ष सविता बुधवंत,संघाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ बेहेळे,पांडुरंग काळे,विनोद फलके,सुरेश खेडकर, बप्पा शेळके,समीर शेख,भास्कर कराळे,संतोष दळे,गणेश मोटे,भारत कोठुळे,शकील बागवान,अर्चना भोसले उपस्थित होते.महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.निवडणुकीसाठी 50% महिलांना तिकीट मिळावीत अशी मागणी केली.बहुसंख्य सदिच्छा प्रेमी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here