रतडगावमधील कामांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

रतडगावमधील कामांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

रतडगावमधील कामांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ग्रामपंचायत रतडगावमध्ये 15 वर्षाचा आढावा घेतला असता 2005 ते 2020 या कालावधीमध्ये विविध कामांमध्ये गैरकारभार झाला असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दत्तात्रय मोहिते यांनी दिले आहे. यामध्ये म्हंटले आहे की, माजी सरपंच तुकाराम बाबुराव वाघुले काळात गैरकारभाराची सखोल चौकशी करावी, यासंबंधी 29 जानेवारी 2021 रोजी पंचायत समती येथे माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागणवली आहे. माजी सरपंच वाघुले हे सत्ता उपभोगत असताना स्वतःचा मुलगा संदिप तुकाराम वाघुले यास सगणक चालक म्हणून रतडगांव ग्रामपंचायतीमध्ये रुजु केले.तसेच गावातील काही कुटुंबातील सदस्य हे सरकारी कर्मचारी असतांना घरकुल व विहिर या विविध योजनांचा लाभ त्यांना देण्यात आला. ज्या गरजुंना योजनांचा लाभ द्यायला पाहिजे आहे त्यांना हा लाभ मिळाला नाही. तसेच माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य शारदा वाघुले यांचे घर सुध्दा अतिक्रमणात येत असुन त्यांची चौकशी करावी यानंतर योग्य ती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.यावेळी कैलास जाधवर, भीमा शंकर, देविदास शिंदे, सचिन बनसोडे, रामा पोटे, विकास पोटे, अशोक मोहिते, नंदू शिंदे आधी गावकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here