समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आरपीआय कटिबध्द ः म्हस्के - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आरपीआय कटिबध्द ः म्हस्के

 समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आरपीआय कटिबध्द ः म्हस्के

वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः अरणगावसह शहरातील माळीवाडा व बाबा बंगाली परिसरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) पक्षात प्रवेश केला. भारिपचे माजी युवक तालुकाध्यक्ष मेहेर कांबळे, शिवम साठे, आफताब शेख यांच्यासह कार्यकर्त्यांचा आरपीआय पक्षात शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी स्वागत केले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नईम शेख, युवक तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहर प्रवक्ता जमीर इनामदार, उपनगर उपाध्यक्ष जावेद सय्यद, संतोष पाडळे, शहर संघटक बंटी बागवान, शहर उपाध्यक्ष अरबाज शेख, युवा नेते ऋषीकेश विधाते, दिनेश पाडळे, यश चाबुकस्वार, प्रशांत शिंदे, ओम भिंगारदिवे, विशाल साठे, बबलू भिंगारदिवे, सोहम भिंगारदिवे, विशाल साठे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      शहराध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, आरपीआय पक्षाचे कार्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने सुरु असल्याने युवकांचा प्रतिसाद मिळत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आरपीआय कटिबध्द आहे.मुस्लिम व धनगर समाजाला खर्या अर्थाने आरक्षणाची गरज असून, या समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पक्षाच्या वतीने शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. भांडवलदारांच्या हिताचे विचार करणारे सरकार सत्तेवर असल्याने शेतकरी, युवक व अल्पसंख्यांक समाजातील प्रश्न गंभीर बनले आहे. शेतकर्यांचे आंदोलन दडपण्यासाठी भाजप सरकार हुकुमशाही पध्दतीने वागत आहे. भांडवलशाही पुरस्कृत जातीयवादी सरकारला पाडण्यासाठी सर्वांनी एकवटण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नूतन कार्यकर्त्यांनी आरपीआयच्या माध्यमातून युवकांचे संघटन करुन सामाजिक प्रश्न सोडविण्यास पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.  

No comments:

Post a Comment