नंदनवन उद्योग समुहाच्यावतीने प.पू.अण्णासाहेब मोरे यांचे स्वागत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

नंदनवन उद्योग समुहाच्यावतीने प.पू.अण्णासाहेब मोरे यांचे स्वागत

 नंदनवन उद्योग समुहाच्यावतीने प.पू.अण्णासाहेब मोरे यांचे स्वागत

प्रत्येकाने नेहमी दातृत्व भाव ठेवला पाहिजे- प.पू. अण्णासाहेब मोरे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः आपण आपल्या नोकरी, व्यवसायातून समाजाहिताचे काम केले पाहिजे. परमेश्वराने दिलेल्या सुबत्तेतील काही वाटा हा गरजूंसाठी ठेवला पाहिजे. त्यामुळे आपल्याला सूख व शांती लाभत असते. आपल्याकडे जे अधिक आहे, ते दुसर्‍याला दिल्यास त्यात वाढच होत असते, त्यासाठी नेहमीच दातृत्वभाव ठेवला पाहिजे. नंदनवन उद्योग समुहाच्यावतीने आपल्या विविध व्यवसायांबरोबरच सामाजिक बांधिलकी जपून सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असेच आहे. हे कार्य असेच सुरु ठेवून गुरुमाऊलीची सेवा करावी, जीवनात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, असे मौलिक विचार त्र्यंबकेश्वर, दिंडोरी येथील प.पू.अण्णासाहेब मोरे यांनी काढले.
      त्र्यंबकेश्वर,दिंडोरी येथील प.पू.अण्णासाहेब मोरे कार्यक्रमानिमित्त नगरमध्ये आले असता त्यांचे नंदनवन उद्योग समुहाच्यावतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक संजय जाधव, नगरसेविका सुवर्णा जाधव, पुष्पताई बोरुडे, सुरेश जाधव, आदेश जाधव, लक्ष्मीबाई जाधव, मीनाताई सत्रे, मंगल जाधव, आशाबाई जाधव, अंजली जाधव आदि उपस्थित होते.याप्रसंगी संजय जाधव यांनी प.पू.अण्णासाहेब मोरे यांचे स्वागत करुन नंदनवन समुहाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या  सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्याची उपक्रमांची माहिती दिली. जाधव परिवाराच्यावतीने धार्मिक कार्यात नेहमीच सहभागी होऊन योगदान देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी दत्ता जाधव, हेमंत जाधव, कावेरी ससाणे, पूजा सत्रे, सावेरी सत्रे, विद्या ससाणे, अश्विनी बोरुडे, वैजिनाथ लोखंडे, विनायक नेवसे, प्रसाद भडके, राज जाधव, पोपटराव वारुळे,  आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment