अहमदनगर शहराचा पर्यटन विकास करण्यासाठी महापालिका अंदाजपत्रकात तरतूद करण्यात यावी - सुरेखा कदम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 9, 2021

अहमदनगर शहराचा पर्यटन विकास करण्यासाठी महापालिका अंदाजपत्रकात तरतूद करण्यात यावी - सुरेखा कदम

 अहमदनगर शहराचा पर्यटन विकास करण्यासाठी महापालिका अंदाजपत्रकात तरतूद करण्यात यावी - सुरेखा कदम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अहमदनगर शहर व परिसरात अनेक महत्वाच्या ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन दृष्टया महत्वाच्या वास्तू आहेत या वास्तूची माहिती राज्य, देश, तथा विदेशातील पर्यटकांना मिळाल्यास अहमदनगर शहरातील आर्थिक उलाढाल व रोजगार वाढण्यास मदत होईल सन 2021-2022 च्या अंदाज पत्रकात पुढील बाबीसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी मागणी मनपा आयुक्त व महापौर यांना माजी महापौर सुरेखा कदम यांनी  निवेदनद्वारे केली आहे
   अहमदनगर शहरात येणार्‍या प्रमुख रस्तावर पर्यटक स्थळा बाबत माहिती फलक व दिशा दर्शक फलक अंतरासह  लावण्यात यावेत.वास्तू जवळ हि माहिती फलक असावेत. अहमदनगर शहरात पर्यटन माहिती सुविधा केंद्र उभारावे पर्यटकांसाठी माहिती पुस्तिका व ट्युरिस्ट मॅप प्रकाशित करण्यात यावा. अहमदनगर शहराच्या संस्थापकाच्या ‘बाजरोजा ’ स्मारकासाठी किमान पादचारी यांचे साठी पेव्हिंग ब्लॉक चा मार्ग तयार करणे. सर्व सामान्य नागरिकांसाठी दर रविवार हेरिटेज वाक व नगर दर्शन साठी किमान एक बस उपलब्ध करून द्यावी. पर्यटनासाठी आवश्यक महत्वाच्या वास्तूची साफसफाई, डागडुजी, रस्ते, पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा उपलब्ध करून द्यावी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here