समस्येवर तोडगा न निघाल्यास 12ला हंडा मोर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

समस्येवर तोडगा न निघाल्यास 12ला हंडा मोर्चा

 समस्येवर तोडगा न निघाल्यास 12ला हंडा मोर्चा

महापालिका घरकुलपालिका कर्मचारी वसाहतीमधील रहिवासी मुलभुत सुविधापासून वंचित

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः वारुळाचा मारुती परिसरातील महापालिका घरकुल योजनेतील रहिवासी आणि पालिका कर्मचारी वसाहतीमधील रहिवासी गेल्या चार वर्षांपासून तेथील सांडपाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहेत.
या भागात सेप्टिक टँक लहान असल्याने तो भरल्यानांतर ह्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या देखील भेडसावत आहे. पिण्याचे पाणी दोन दिवसाआड येत असल्याने या वसाहतीतील नागरिकांना पाणी भरण्यासाठी कसरत करावी लागते. मुख्य रस्त्यावर आणि आतील बाजूस लाईट नसल्याने लूटमार आणि दहशती वाढल्या आहेत. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाने कारवाई न केल्याने या वसाहतीतील नागरिक आणि महिला यांनी आज महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समस्याचा पाढा वाचला.
    या वेळी महापौरांनी या समस्या सोडवण्यासाठी स्वतः वसाहतीत येऊ असे आश्वासन दिले. या समस्येवर तोडगा न निघाल्यास नागरिक हंडा मोर्चा करणार आहेत. त्याचसोबत 27 फेब्रुवारीला पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा दिलाय. या प्रसंगी संतोष ठोकळ, बाळासाहेब उमाप, राधा सोनावणे, अशोक गायकवाड, पोपट लोखंडे, एकनाथ नन्नावरे, गणेश चांदणे, भीमा खंडागळे, दत्ता देढे, भाऊ शेरकर, अभिजित चव्हाण, प्रभाकर पठारे, दत्तू आपटे, संतोष गाडे, रंगनाथ गाडे, शिवा गाडे, आदीसह महिला व पुरूष मोठया संख्येने  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment