भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मैद यांच्याकडून आढावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 11, 2021

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मैद यांच्याकडून आढावा

 भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मैद यांच्याकडून आढावा

आत्मनिर्भर योजनेंतर्गत युवकांना प्रोत्साहन- योगेश मैद

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सर्वसामान्यांसाठी विविध लाभाच्या योजना राबवित आहेत. या योजनांची माहिती संबंधितांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. आत्मनिर्भर योजनेंतर्गत युवकांसाठीही अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांसाठी  स्वनिधी योजनांतर्गत 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देऊन त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ही योजना युवकांपर्यंत पोहचविण्याचे त्यांना आत्मनिर्भर करण्याचे युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे. त्याचबरोबर पक्षाची ध्येय-धोरणे युवकांना समजून सांगून पक्षाशी त्यांना जोडावे. यासाठी राज्यभर अभियान राबविण्यात येत आहे.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक अंकित संचेती, युवा मोर्चा सरचिटणीस आशिष आनेचा, मल्हार गंधे आदि उपस्थित होते.
   याप्रसंगी महेश तवले यांनी भाजप युवा मोर्चाचे नगरमध्ये सक्रिय काम असून, युवकांना पक्षामध्ये सामावून घेण्यात येत आहे. युवा मोर्चाच्या कार्यकर्ते पक्षाची कार्यक्रम सर्वसामान्यापर्यंत पोहचवून केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वरिष्ठ पदाधिकारी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताकद देत असून, भविष्यात युवा मोर्चाचे कार्यकर्ते पक्षात मोठे योगदान देतील असे सांगून शहरातील युवा मोर्चाचा आढावा सादर केला.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद निंबाळकर यांनी केले तर आभार आशिष आनेचा यांनी मानले. याप्रसंगी युवा मोर्चाचे  उपाध्यक्ष राजेंद्र सातपुते, उमेश भालसिंग, उदय शिंदे, किरण जाधव, राकेश भाकरे, विकास झिंजुर्डे, भिंगार युवा मोर्चा अध्यक्ष महेश कटोरे, आकाश सोनवणे, अ‍ॅड.आशिष पोटे, आनंद निंबाळकर, सिद्धार्थ ठाकूर, यश शर्मा, अजित कोतकर, अंकुश भापकर, रमेश भराडिया, कार्तिक तगारे, वैभव झोटिंग, सिद्धेश नाकाडे, हुजेफा शेख, साहिल शेख आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here