शिव राष्ट्र सेनेच्या नालेगांव शाखेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

शिव राष्ट्र सेनेच्या नालेगांव शाखेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

 शिव राष्ट्र सेनेच्या नालेगांव शाखेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

समाज हितासाठी काम करुन नागरिकांचे प्रश्नांसाठी पुढाकार घेणार- संतोष नवसुपे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः पाश्चात्य संस्कृतीचे होणारे आक्रमन हिंदू राष्ट्रावर हा आघात आहे. या विरुद्ध संघर्ष करुन ते आक्रमण परतविण्याचे कार्य पक्षाच्यावतीने करण्यात येणार आहे. शिव राष्ट्र सेना छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून देव, देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी स्थापन झाली आहे. त्यासाठी बालकांवर चांगले संस्कार करुन त्यांना शिक्षित करुन त्यांच्यात याबाबत आतापासूनच जागृती केली पाहिजे. पक्षाच्यावतीने समाज हितासाठी काम करुन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व पदाधिकारी काम करत आहेत. त्यामुळे अनेक लोक पक्षाशी जोडले जात आहेत. पक्षाची ताकद वाढत आहे. या भागात शाखा झाल्याने या भागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शाखा पुढाकार घेईल. तसेच पक्षाचे विविध कार्यक्रम या भागात राबविले जातील, असे प्रतिपादन शिव राष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी केले.
   शिव राष्ट्र सेना पक्षाची नालेगांव, कल्याण रोड येथे शाखेची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी शालेय शालेय विद्यार्थ्यांना वह्या-पेन्सीलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, दलित आघाडीचे अध्यक्ष अनिल शेकटकर, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विजय पितळे, शहर युवा अध्यक्ष मुकुंद आंबेकर, युवा प्रमुख शंभु नवसुपे, डॉक्टर सेलेचे डॉ.विकास दळवी, इंजिनिअर सेलचे ओंकार जाधव, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष समिर शेख आदिंसह शाखा अध्यक्ष नितीन थोरात, उपाध्यक्ष पप्पू गारदे, सचिव सिद्धार्थ गाडे उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर खडके यांनी केले तर आभार अनिल शेकटकर यांनी मानले. यावेळी करण आगरकर, अभिजित खेडकर, हर्षल जाधव, अक्षय सांगळे, ओंकार हुळावळे, साहिल सोनटक्के, राघव पाचारणे, माऊली धोंडे, निखिल लहारे आदि उपस्थित होते. याप्रसंगी गणेश खंडागळे यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment