मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना वैद्यकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना वैद्यकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप

 मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना वैद्यकीय मदतीच्या धनादेशाचे वाटप

पतसंस्था संकट काळात सभासदांच्या मागे खंबीरपणे उभी राहील ः मुदगल

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महापालिका ही सेवा देणारी संस्था असून कर्मचारी हे विविध विभागाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करत असतात. विविध प्रश्नाबरोबरच नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचे काम महापालिका कर्मचारी करत असतात. याचबरोबर कर्मचार्‍यांचेही आरोग्य अबाधित रहावे व वैद्यकीय उपचारासाठी अहमदनगर महानगरपालिका सहकारी पतसंस्थेच्यावतीने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या आर्थिक वर्षात पतसंस्थेने सुमारे 2 लाख रूपयांपर्यंत वैद्यकीय मदत देण्याचे काम केले आहे. सभासदांच्या आर्थिक संकटाच्या काळामध्ये नेहमीच सकारात्मक दृष्टीकोनातून पतसंस्थेने निर्णय घेण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन चेअरमन बाबासाहेब मुदगल यांनी केले.
   अहमदनगर महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना वैद्यकीय मदत निधीचे वाटप बाळासाहेब कराळे व मीरा थोरात यांना बाळासाहेब गंगेकर व अजय कांबळे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप केले. यावेळी संस्थेचे चेअरमन बाबासाहेब मुदगल, व्हा. चेअरमन विकास गिते, संचालक जितेंद्र सारसर, बाळासाहेब पवार, सतीश ताठे, किशोर कानडे, व्यवस्थापक आनंद तिवारी आदी उपस्थित होते. यावेळी मुदगल म्हणाले की, या आर्थिक वर्षामध्ये सुनील कांबळे, छाया लिमकर, मंगल काळे, मुकुंद वैराळ, वंदना सारसर, बाळासाहेब कराळे व मीरा थोरात यांना सुमारे 2 लाख रूपयांचे वैद्यकीय मदत देण्याचे काम केले आहे. याचबरोबर पतसंस्थेने सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व लग्न समारंभासाठी ताबडतोब कर्जरुपी मदत करत आहे. सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पतसंस्था नेहमीच तत्पर असेल. याचबरोबर कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये महापालिका कर्मचार्‍यांनी आपला जीव धोक्यात घालून शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवून आपले कर्तव्य पार पाडले. यामध्ये काही कर्मचार्‍यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत करण्याचे काम सर्वात प्रथम महापालिका कर्मचारी पतसंस्थेने केले, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment