मनपा कर्मचार्‍यांचा रिक्षा, टॅक्सी संघटनेच्या वतीने सत्कार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 6, 2021

मनपा कर्मचार्‍यांचा रिक्षा, टॅक्सी संघटनेच्या वतीने सत्कार.

 मनपा कर्मचार्‍यांचा रिक्षा, टॅक्सी संघटनेच्या वतीने सत्कार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महापालिकेचे सफाई कर्मचारी शहराची दररोज स्वच्छता ठेवण्याचे काम करत असतात. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होत असते. केंद्रसरकारने भारत स्वच्छता अभियानातर्गत महानगरपालिकेने सन 20019-20270 मध्ये थ्रीस्टार मानंकन मिळवले आहे यावर्षी 5 स्टार मानंकनासाठी भाग घेतला असून महापालिकेचे सफाई कर्मचारी व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी शहराची स्वच्छता, स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेऊन शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा रिक्षा , ट्रक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने महापालकिच्या कर्मचार्‍याचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
   दत्ता वामन म्हणाले की, महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता मोहिमेमध्ये हिरारीने भाग घेऊन शहर स्वच्छ ठेवण्याचे काम सुरू आहे. स्वच्छतेमध्ये मनपा कर्मचार्‍याचे योगदान महत्त्वाचे आहे. चांगल्याकामाबद्दल त्याचा गुणगौरव करणे गरजेचे आहे. नगर सेवक अविनाश घुले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असून चांगले काम करणार्‍यांच्या पाठिमागे असून आमचे रिक्षा संघटना उभी राहते. असे ते म्हणाले यावेळी उपाध्यक्ष दत्ता वामन, विजय कराळे, दिपक गहिले, दिलीप गायकवाड, नदीम तांबोळी, शाहानवाज शेख, सुनिल पवार, गणेश आरोळे, शंकर गोरे, पोपट कराळे, राजू टिपरे सचिन व्हावळ, रतन गायकवाड, सागर लोखडे, अशोक औशिकर, सुनिल ठाणगे, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment