स्वच्छ सर्वेक्षणात सुरभी हॉस्पिटल प्रथम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

स्वच्छ सर्वेक्षणात सुरभी हॉस्पिटल प्रथम

 स्वच्छ सर्वेक्षणात सुरभी हॉस्पिटल प्रथम


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत महापालिकेने आयोजित केलेल्या सर्वेक्षणात हॉस्पिटल विभागात सुरभी हॉस्पिटलने प्रथम क्रमांक मिळवला. आज महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन हॉस्पिटलचा गौरव केला.
   यावेळी सुरभी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. राकेश गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. आशिष भंडारी, डॉ. अमित पवार, डॉ. गणेश जंगले यांनी सन्मानाचा स्वीकार केला. कार्यक्रमास उपमहापौर मालनताई ढोणे, उपायुक्त यशवंत डांगे, हरियालीचे सुरेश खामकर, माजी नगरसेवक मा.श्री.दामूशेठ बठेजा, स्वच्छता निरिक्षक श्री.भांगरे, श्री.किशोर कानडे, श्री.सोनू चौधरी  आदी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, मनपाच्या माध्यमातून स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 ची कार्यवाही नगर शहरात सुरू असून विविध प्रकारचे कार्यक्रम उपक्रम व प्रकल्प राबविण्यात येते आहेत. यामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेवून शहर स्वच्छतेसाठी सकारात्मक सहयोग द्यावा जेणेकरून स्वच्छ सर्व्हेक्षणाचा शहराचा 10 च्या आत क्रमांक येईल आणि शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध होईल.
   डॉ. राकेश गांधी म्हणाले की, रुग्णांच्या आरोग्यासाठी हॉस्पिटलची स्वच्छता आवश्यक असते. याच उद्देशाने  व्यवस्थापनाने सुरभी हॉस्पिटल स्वच्छ कसे राहील, यावर सुरुवातीपासूनच भर दिला आहे. त्यासाठी स्वतंत्र स्वच्छता यंत्रणा आहे. स्पेशल रूम, आयसीयु, ऑपरेशन थिएटर अशा सर्व ठिकाणी क्लीनिंग करण्यात येते. निर्जंतुक वातावरणात रुग्णावर उपचार करण्याचा ’सुरभी’चा प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment