खते बी-बियाणे असो.च्यावतीने शिवाजी जगताप यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 27, 2021

खते बी-बियाणे असो.च्यावतीने शिवाजी जगताप यांचा सन्मान

 खते बी-बियाणे असो.च्यावतीने शिवाजी जगताप यांचा सन्मान

नगर जिल्ह्यास प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पुरस्कार

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक तपासणी संवर्गात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नगर जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या जिल्ह्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
   नगर जिल्हयाला हा बहुमान मिळाल्याबद्दल खते बी-बियाणे असोसिएशन, अ.नगर यांच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साहेबराव नवले, छबूराव हराळ, संजय बोरा, चोरबेले, दिलीप कोकणे, विजय गांधी, सचिन वरखेड, बच्चू गांधी आदी उपस्थित होते.
यावेळी सत्कारास उत्तर देताना श्री. जगताप म्हणाले की, जिल्हाधिकारी डॉ. भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली असून, त्यासाठी जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला आहे. योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी 5% लाभार्थ्यांची भौतिक तपासणी विहित मुदतीत केल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे कोरोनासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीतही तालुकास्तरावर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी योजनेचे कामकाज ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार पूर्ण केले. याची दखल थेट देशपातळीवर घेण्यात आली, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here