दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः 10वी आणि 12वीच्या परीक्षाचे  शिक्षण विभागाने काल वेळापत्रक जाहीर केले. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात. संभाव्य वेळापत्रकासाठी पालकांच्या सुचनांचा विचार करुन अखेर इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 10 वीची परीक्षा :  इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे रोजी दरम्यान होईल. 12 वीची परीक्षा : इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे.

No comments:

Post a Comment