‘स्वच्छता मोहिम’ ही एक लोक चळवळ व्हावी- उपायुक्त यशवंत डांगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

‘स्वच्छता मोहिम’ ही एक लोक चळवळ व्हावी- उपायुक्त यशवंत डांगे

 ‘स्वच्छता मोहिम’ ही एक लोक चळवळ व्हावी- उपायुक्त यशवंत डांगे


नगरी दवंडी/
प्रतीनिधी
अहमदनगर ः  नागरिकांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यासाठी मा.केंद्र सरकारच्या वतीने भारत स्वच्छ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये अ.नगर मनपा ने फाईव्ह स्टार मानांकनासाठी भाग घेतला असून मनपाचे अधिकारी व कर्मचारी सकाळी 7 वा. शहरातील विविध भागात जावून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये रस्त्यावरील मातीचे ढिगारे, दगडगोटे, गवत काढण्याचे काम केले जात आहे. शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे या अभियानामध्ये नागरिकांनी भाग घेवून आपले कर्तव्य बजवावे. स्वच्छता मोहिम ही एक लोक चळवळ व्हावी  यासाठी नागरिकांनी पुढे यावे. असे प्रतिपादन उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी केले.
      भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत माळीवाडा, वाडीयापार्क परिसरामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता अभियान राबविले यावेळी उपायुक्त यशवंत डांगे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. मनपाचे कर्मचारी सकाळी 7 वा. शहरातील विविध ठिकाणी जावून स्वच्छता करित असतात त्याच बरोबर नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व पटावे यासाठी जनजागृतीचे कामही केले जाते. प्रत्येक नागरिकांनी आपले घर, परिसर व कॉलनी स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. कर्मचारी व अधिकारी स्वच्छता अभियानामध्ये आपले कर्तव्य करित आहेत. परंतु नागरिकांनी या अभियानामध्ये भाग घेवून आपले कर्तव्य पार पाडावे. स्वच्छता हे एकाचे काम नसून सर्वाचे सहकार्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment