नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्हा दौर्‍यावर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्हा दौर्‍यावर.

 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्हा दौर्‍यावर.


नगरी दवंडी/
प्रतीनिधी
अहमदनगर ः राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे उद्या शुक्रवार दिनांक 12 फेब्रवारी, 2021 रोजी अहमदनगर जिल्हा दौर्यावर येत असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
   दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड अहमदनगर येथे आगमन व तेथून मोटारीने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगरकडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. सकाळी 11.15 ते 12.30 वाजता अहमदनगर महानगरपालिकाअंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा. दुपारी 12.30 ते दुपारी 2.15 वाजता अहमदनगर जिल्हयातील नगरपरिषद व नगर पंचायती अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा. दुपारी 2.15 ते 2.30 वाजता पत्रकार परिषद, स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता राखीव, स्थळ- शासकीय विश्रामगृह, अहमदनगर. दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड, अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड, अहमदनगर येथे आगमन व तेथून हेलिकॉप्टरने जालनाकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment