शहर काँग्रेसच्यावतीने जाकीर शेख यांचा सत्कार जाकिर शेख यांचे विविध क्षेत्रात बहुमोल कार्य-किरण काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

शहर काँग्रेसच्यावतीने जाकीर शेख यांचा सत्कार जाकिर शेख यांचे विविध क्षेत्रात बहुमोल कार्य-किरण काळे

 शहर काँग्रेसच्यावतीने जाकीर शेख यांचा सत्कार जाकिर शेख यांचे विविध क्षेत्रात बहुमोल कार्य-किरण काळे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जाकिर हुसेन शेख यांना दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड मिळाल्याबद्दल शहर काँग्रेसच्यावतीने अध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते ज्ञानदेव वाफारे, मनोज गुंदेचा, सय्यद खलील, आय.बी.शाह, निजाम जहागिरदार, रियाज शेख, अन्वर सय्यद, मुबीन शेख, विशाल बेलपवार आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
    याप्रसंगी किरण काळे म्हणाले, जाकीर शेख यांचे विविध क्षेत्रातील कार्य बहुमोल आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या कलेने वेगवेळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची उचित दखल घेऊनच त्यांना दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड मिळाला, ही नगरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. सांस्कृतिक व पर्यटन वाढीसाठी त्यांनी नगरमध्ये केलेले काम आपणा सर्वांसाठी दिशा दर्शक असेच आहे, असे सांगून शुभेच्छा दिल्या.यावेळी अनेकांनी जाकिर शेख यांच्या कार्याचा उल्लेख करुन अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment