रोटरी कोविड केअर सेंटरच्या ‘जीवनदान’ अंकाचे प्रकाशन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 11, 2021

रोटरी कोविड केअर सेंटरच्या ‘जीवनदान’ अंकाचे प्रकाशन

 रोटरी कोविड केअर सेंटरच्या ‘जीवनदान’ अंकाचे प्रकाशन

रोटरीचे सेवा कार्य कायम स्मरणात राहील : प्रांतपाल हरीश मोटवाणी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगरमध्ये जुलै महिन्यात करोणाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतांना नगर मधील 5 रोटरी क्लब एकत्र येत केवळ 8 दिवसात रोटरी कोविड केअर सेंटर सुरु करून सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार दिला होता. या कोविड सेंटर मधून हजारो नागरिकांनी मोफत उपचार घेत करोनावर यशस्वी मात केली. पाचही रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी मनापासून दिलेल्या योगदान मुळे हे मानवसेवेचे मोठे कार्य झाले आहे. या कोविड उपचार सेंटरचे उद्घाटन माझ्या हातून झाले हे माझे सौभग्य आहे. मानवतेचे अनोखे उदाहरण ठरलेले हे सेवा कार्य कायम सर्वांच्या स्मरणात राहील, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे प्रांतपाल हरीश मोटवाणी यांनी केले.
   नगर शहरात रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मेन, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटी या पाच रोटरी क्लबने एकत्र येत महानगरपालिकेच्या सहकार्यातून मोफत रोटरी कोविड केअर सेंटर सुरु केले होते. यावेळी सर्वांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि आलेल्या अनुभवांची माहिती असलेल्या ‘जीवनदान’ अंकाचे प्रकाशन रोटरी क्लबचे इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ महेश कोटबागी, प्रांतपाल हरीश मोटवाणी, माजी प्रांतपाल प्रमोद पारीख यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
    यावेळी रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितिज झावरे, सचिव दिगंबर रोकडे, रोटरी क्लब अहमदनगर चे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधव, सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवले, सचिव ईश्वर बोरा, रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा गीता गिल्डा, सचिव देविका रेळे, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीचे अध्यक्ष रफिक मुंशी, सचिव सुयोग झंवर, प्रोजेक्ट चेअरमन निलेश वाईकर, प्रतिभा धूत, डॉ.रिझवान अहमद आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment