ज्ञानगंगा विद्यालयात विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मास्कचे मोफत वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

ज्ञानगंगा विद्यालयात विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मास्कचे मोफत वाटप

 ज्ञानगंगा विद्यालयात विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मास्कचे मोफत वाटप

ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा पुढाकार

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विळदच्या ज्ञानगंगा विद्यालया मधील विद्यार्थ्यांना महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसचे सुजित जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राबवला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विळदचे माजी सरपंच आबासाहेब पवार होते. यावेळी पंजाबराव अडसुरे, हंसराज अडसुरे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष विजय अडसुरे, सुनील जवरे, नितीन जगताप, विकास शिंदे, कैलास शिंदे, संदीप जगताप यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.
   यावेळी बोलताना सुजित जगताप म्हणाले की, ना.बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचे तालुक्यातील विद्यार्थी काँग्रेसने ठरवले. त्या भूमिकेतूनच आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येताना कोरोनाच्या नियमांचे काटेकोपणे पालन करत स्वतःची काळजी घेतली पाहिजे. या पुढील काळात नगर तालुक्यात विद्यार्थी काँग्रेसचे काम अधिक मजबूत करण्यासाठी ना. बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जेष्ठ नेते तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, युवक काँग्रेस-एनएसयूआयचे जिल्हा समन्वयक किरणभाऊ काळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ड. अक्षय कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाईल, असे यावेळी सुजित जगताप म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब पवार यांनी यावेळी सुजित जगताप आणि विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या सामाजिक पुढाकाराचे कौतुक केले. त्याचबरोबर ज्ञानगंगा विद्यालयाच्या मुख्याध्यापक तसेच शाळा प्रशासनाच्या वतीने विद्यार्थी काँग्रेसचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले. आभार योगेश जयस्वाल यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी काँग्रेसचे ऋतिक शिरवाळे, वैभव कांबळे, राज गायकवाड, नितीन होडगर, सोमनाथ गुलदगड, पवन वाळके, साहिल शेख आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment