अहमदनगर बोअरवेल ओनर असोसिएशनच्या वतीने डिझेल भाववाढीच्या निषेधार्थ संप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

अहमदनगर बोअरवेल ओनर असोसिएशनच्या वतीने डिझेल भाववाढीच्या निषेधार्थ संप

 अहमदनगर बोअरवेल ओनर असोसिएशनच्या वतीने डिझेल भाववाढीच्या निषेधार्थ संप

आता डिझेलच्या किमतीप्रमाणेच दर ठरवले जाणार आहे - तुकाराम तावरे
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बोअरवेलचा व्यवसाय डिझेल भाववाढीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे व्यवसायिकांवर आर्थिक संकट आले आहे. याच बरोबर कामगारांवर उपास मारीची वेळ आली आहे. एक वर्षापासून कोरोनाचे  संकट आता दररोज होणार्‍या डिझेल भाववाढीचे संकट बोअरवेलचा व्यवसाय हा संपूर्णपणे डिझेलवर अवलंबून असतो डिझेलची भाववाढ वाढत असल्यामुळे व्यवसायिकांना भाववाढ करावी लागते. त्यामुळे ग्राहकांबरोबर शेतकर्‍यांना या भाववाढीला सामोरे जावे लागते. शेतकरी आणि बोअरवेल व्यवसायिक यांचे हितसंबंध असतात. शेतकर्‍यांना परवडेल या दरानेच आम्ही व्यवसाय करतो. परंतु डिझेलच्या भाववाढीमुळे नाईलाजास्तव आता डिझेलच्या किमतीप्रमाणेच दर ठरवले जाणार आहे. डिझेलच्या भाववाढीच्या निषेधार्थ अहमदनगर बोअरवेल ओनर असोसिएशनच्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी 2021 पर्यत संप पुकारला आहे. तसेच भाववाढीच्या निषेधार्थ व्यवसायिक व कामगार यांनी निदेर्शने केली आहेत. अशी माहिती श्री.तुकाराम तावरे यांनी दिली.  यावेळी श्री.गणेश सातपुते, कुमार होळकर, महेश शेवाळे, गोपी कलाई, विजय लोखंडे, संदिप तावरे, प्रविण डोंबरे , राजू लोंढे, जयसिंग रोहाकेले, शामराव लाकूडझोडे, राजेश नवसुपे, नितीन खरात, संतोष लोखंडे, अण्णा देवराज, अण्णा मुरगन , लिंगास्वामी, सतिष होळकर, नंदू दाणी, रामदास चौधरी आदि उपस्थित होते.अहमदनगर बोअरवेल ओनर असोसिएशनच्या वतीने कल्याण रोड बायपास जवळ व्यवसायिक व कामगारांनी आपआपल्या बोअरवेलच्या गाडया लावून संप पुकारून डिझेल भाव वाढीचा निषेध व्यक्त केला.

No comments:

Post a Comment