उड्डाणपूल कामालगतचे अतिक्रमणे काढावीत जवाहर मुथा यांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

उड्डाणपूल कामालगतचे अतिक्रमणे काढावीत जवाहर मुथा यांची मागणी

 उड्डाणपूल कामालगतचे अतिक्रमणे काढावीत जवाहर मुथा यांची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर शहरात प्रगतीपथावर असलेल्या उड्डाणपूलाचे काम वेगाने सुरु झाले आहे. या उड्डाणपूला मुळे शहराचा वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. उड्डाणपूलाच्या कामामुळे कोठी पासून स्टेट बँक चौकापर्यं रस्त्यात  पत्रे लावल्याने वाहतुकीसाठी रस्ता अरुंद झाला आहे. मात्र येणार्‍या जाणार्‍या वाहनांची संख्या वाढतच असल्याने त्याठिकाणी दिवसभर मोठ्याप्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. कोठी चौक ते कोठला चौका पर्यंत वाहनांना जाण्यास 40 ते 50 मिनिटे लागत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. या वाहतुकीच्या कोंडीचा काम करणार्‍या इंजिनियर व कामगार यांनाही त्रास होत आहे. रस्त्यावर दुकाने व टपर्‍यांचे तसेच पथ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमणामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासाठी जिल्हा व मनापा प्रशासनाने तातडीने या भागातील रस्त्या लगतचे अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे. त्याच बरोबर संरक्षक भिंती, लाईट व टेलीफोनचे खांब, विजेच्या तारा, पाईपलाईन स्थलांतरित करणेही आवश्यक आहे. अवजड वाहतून सक्तीने बायपास रस्त्याने वळवणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग कार्यलय यांनी उड्डाणपूलाचा परिसर मोकळा करण्यासाठी, अतिक्रमणे काढण्यासाठी व वाहतुकीची कोंडी होवू नये यासाठी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नगर शाखेचे संस्थापक जवाहर मुथा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment