रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता समारंभ संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता समारंभ संपन्न

 रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता समारंभ संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान ’रस्ता सुरक्षा अभियान’ महामार्ग पोलीस केंद्र अहमदनगर यांच्यामार्फत राबविण्यात आले. त्याचा सांगता समारंभ अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संचलित भिंगार हायस्कूल मध्ये महामार्ग पोलीस  यांच्या वतीने घेण्यात आला महामार्ग पोलीस कायमच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना व सूचनांची अंमलबजावणी करत असतात परंतु तरी देखील जनता वाहतुक नियमांचे उल्लंघन करतात त्यामुळे दंडात्मक कार्यवाही केली जाते परंतु त्याचा मूळ उद्देश लोकांनी रस्ता सुरक्षा नियम पाळावेत हाच असतो हा संदेश सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी यांनी  दिला.
तसेच  यांनी  विद्यार्थ्यांना व शिक्षकांना हेल्मेट वापरणे हे आत्यंतिक गरजेचे कसे आहे हे समजावून सांगितले तसेच रस्ता सुरक्षा अभियान फक्त ठरावीक काळापुरतेच न करता वर्षभर व त्याचे पालन केले तर निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होईल. असे वक्तव्य त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून अ.ए.सो साई तिच्या भिंगार हायस्कूल मध्येकेले. त्याचबरोबर रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यालयात चित्रकला स्पर्धा ,निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते.त्यातील विजेत्यांना श्री गिर यांच्या हस्ते बक्षीस वितरणही करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य नितिषा चावरे मॅडम, पर्यवेक्षक श्री भरतकुमार भालसिंग तसेच, गितांजली भावे सर्व शिक्षक वृंद तसेच नगर पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष अमित विधाटे, राहुरी तालुका पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष आशुतोष नवले, पोलीस नाईक जाधव, तागड, हेडकॉन्स्टेबल  पवार तसेच राष्ट्रीय सुरक्षा दलाचे मार्गदर्शक व क्रीडाअध्यापक श्री शिंदे उन्मेश सर या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment