महिलांवर घर संसाराबरोबरच गावाच्या कारभाराची जबाबदारी ः भुजबळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

महिलांवर घर संसाराबरोबरच गावाच्या कारभाराची जबाबदारी ः भुजबळ

 महिलांवर घर संसाराबरोबरच गावाच्या कारभाराची जबाबदारी ः भुजबळ

सकल नाभिक समाजातर्फे सरपंच, उपसरपंच सदस्यांचा सन्मान

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः आजची स्त्री ही उद्याची नारी शक्ती आहे. पूर्वी काही विशिष्ट समाजातील महिला समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असत, आज मात्र सर्व समाजातील महिलांना आरक्षणामुळे प्रगतीचा मार्ग सापडला. समाजकारण असो की राजकारण कोणतेही क्षेत्र असो आता पुरुषांप्रमाणेच महिलांना मान सन्मात मिळाल्याने घरसंसारा बरोबरच गावाच्या कारभाराची जबाबदारी मिळाल्याने खर्‍याअर्थाने त्या सक्षम होत आहेत, असे प्रतिपादन बाळासाहेब भुजबळ यांनी केले.
   अहमदनगर जिल्हा सकल नाभिक समाजातर्फे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्यपदी विजयी झालेल्या समाजबांधवांचा सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्री.भुजबळ बोलत होते. कार्यक्रमास माऊली गायकवाड, अशोक औटी, रामदास आहेर, बाबुराव दळवी, वनिता बिडवे, विशाल सैंदाणे, राजेश सटाणकर, बापू औटी, अनिल निकम, निलेश पवळे, योगेश पिंपळे, श्रीपाद वाघमारे, रमेश बिडवे, शाम औटी, बच्चू सोन्नीस उपस्थित होते.
   श्री.भुजबळ पुढे म्हणाले घर सांभाळून समाजकार्य करणार्या महिला आता सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. गावाचा कारभार सांभाळाण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. कुटूंबाप्रमाणे गावकारभार चांगला चालवा. ग्रामविकासाच्या योजना राबवा, असे ते म्हणाले.
   यावेळी नाभिक समाजातील काही समाज बांधव, महिला आदिंनी ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच, उपसरपंच पदापर्यंत मजल मारली यामध्ये पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूरचे सरपंच विलास काळे, कर्जत तालुक्यातील नागलवाडीच्या सरपंच गीता पवळ, पाथर्डी तालुक्यातील धामणगांवच्या सरपंच शालन जायभाये, जांभळीच्या उपसरपंच विठाबाई गोरे यांचा तर वनिता बिडवे यांना बाबा आमटे पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नाभिक समाजाच्या कार्यात सतत मोलाचे योगदान देणार्या प्रभाकर साळूंखे, श्रीरंग गायकवाड, सुलभा सटाणकर यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सन्मानित करण्यात आले. यावेळी ओबीसीचे बाळासाहेब भुजबळ, बाबुराव ताकपिरे, कांचन शिंदे, अमृता थोरात, शिल्पा भदाणे आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment