मराठी साहित्य पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी कार्य करा : गोविलकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 27, 2021

मराठी साहित्य पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी कार्य करा : गोविलकर

मराठी साहित्य पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी कार्य करा : गोविलकर

मराठी राजभाषा दिनानिमित्त स्नेहबंधतर्फे गौरव

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः मराठी साहित्य, संत साहित्याची परंपरा आजच्या पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचे कार्य सर्वांनी करावयास हवे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. लीला गोविलकर यांनी केले.
   मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त स्नेहबंध फौंडेशनतर्फे लेखिका प्रा. डॉ. गोविलकर यांचा अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी अतुल खामकर, हेमंत ढाकेफळकर, अमेय रेडकर, माधवी कुलकर्णी, अनिता खिस्ती, ज्योती केसकर उपस्थित होत्या. लेखिका प्रा. डॉ. गोविलकर म्हणाल्या, आदर, सत्कार हा जवळच्या माणसाने करण्यापेक्षा अनोळखी व्यक्तीने केलेला सत्कार जास्त लक्षात रहातो.
   स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, आज मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग खुले झाले आहेत. संगणकीय तंत्रज्ञानही मराठी भाषेत उपलब्ध होत आहे. विविध ज्ञानशाखांमधील उपयुक्त ज्ञान आज मराठीत येत आहे. या सगळ्याला जोड असायला हवी ती आपल्या निग्रहाची.. मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगण्याची.. आणि तिची जोपासना व संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची!

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here